वाहन विमा घेणे 25 टक्क्यांपर्यंत महाग होणार! कोट्यवधी नवीन व जुन्या वाहनधारकांना बसणार या निर्णयाचा फटका..

देशातील 25 विमा कंपन्यांनी IRDAI कडे प्रस्ताव दिला असून वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. कंपन्यांची मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील कोट्यवधी जुने वाहनधारक आणि नवीन वाहने खरेदी करणाऱ्या लोकांवर होणार आहे.

आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या दरांमुळे हैराण असणाऱ्या देशातील करोडो वाहनधारकांना महागाईचा आणखी एक डोस मिळू शकतो. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता वाढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याची गरज आहे असे सांगितले. कंपन्यांची मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील करोडो वाहनधारकांवर होणार आहे.

IRDAI ला दिला प्रस्ताव

Zeebiz च्या अहवालानुसार, भारतात जवळपास 25 सामान्य विमा कंपन्या आहेत. त्यांच्या प्रस्तावाला IRDAI हिरवी झेंडी देईल, अशी कंपन्यांना आशा आहे. कंपन्यांचा असा विश्वास आहे की त्यांना कोरोनामुळे खूप त्रास होत आहे. हे पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्सचा सध्याचा प्रीमियम चांगला नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. काही कंपन्यांची परिस्थिती अशी झाली आहे की त्यांची सॉल्व्हेंसी त्यांच्या विहित मर्यादेच्या खाली गेली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दावेही वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांवरील दबावही वाढला आहे.

थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक

2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, नवीन दुचाकी खरेदी करताना 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि चारचाकी वाहनांसाठी 3 वर्षांचा थर्ड पार्टी विमा घेणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, कोणतेही वाहन जे रस्त्यावरून फिरते, त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. विमा प्रीमियम IRDAI द्वारे निर्धारित केला जातो. प्रीमियम दरवर्षी बदलतो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!