FD Interest Rate : एफडीवर मिळतंय 9.21 टक्के व्याज दर, शिवाय 750 दिवसांसाठी पैसे गुंतवल्यास होईल भरघोस फायदा..

FD Interest Rate : प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही पैश्यांची बचत करून त्याची गुंतवणूक करण्याच्या विचारात असतो. जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित करता होईल. बचतीसाठी बँकांच्या मुदत ठेव योजना (FD Scheme) हा एक सर्वात लोकप्रिय आणि अतिशय उत्तम पर्याय मानला जातो.

FD Interest Rate

लोक बचत करण्यासाठी एफडी (FD) ला जास्त पसंती देतात, ज्यामध्ये पैसे तर सुरक्षित राहतातच शिवाय त्यांना चांगला परतावा सुद्धा मिळतो. मागील वर्षी रेपो दरात एकापाठोपाठ एक वाढ झाल्यामुळे महागाईने कळस गाठला, हे सगळं असताना सुद्धा बँकांनी त्यांच्या एफडीचे दर वाढवून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे ग्राहकांनी एफडी योजनेला (FD scheme) प्राधान्य दिलं आणि हा ट्रेंड अजूनसुद्धा कायमच आहे. आता तुम्हालाही बँक एफडी(FD scheme)वर 9 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज दर मिळवून (FD Interest Rate) भरघोस परतावा मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

एफडीवर मिळत आहे 9.21 टक्के व्याजदर (FD Interest Rate)

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (Fincare Small Finance Bank) ही त्यांच्या ग्राहकांना एफडी वर 9 टक्क्यांपेक्षा (FD Interest Rate) जास्त व्याज देत असून त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 9.21 टक्के व्याज मिळविण्याकरिता 750 दिवस बँकेत FD करावी लागणार आहे. बँकेच्या जारी केलेल्या बदलानुसार, दोन कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीकरिता एफडी दरांमध्ये बदल करण्यात आला असून एफडी (FD scheme) वरील नवे व्याजदर 28 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.

FD Interest Rate

ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक उत्तम पर्याय

एफडी (FD) वर 9 % व्याज देणाऱ्या अनेक बँका आहेत, मात्र फिनकेअर स्मॉल फायनान्स ही बँक (Fincare Small Finance Bank) इतर बँकांपेक्षा जास्त म्हणजेच 9.21 टक्के व्याजदर (FD Interest Rate) ऑफर करून सर्वात जास्त व्याज देणारी एकमेव बँक आहे. एफडीवरील हा व्याजदर फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी असून सामान्य नागरिकांसाठी एफडीवर जास्तीत जास्त 8.61 टक्के एवढे व्याज दिले जात आहे. अलीकडेच, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने (Fincare Small Finance Bank) एफडीवरील व्याजदरांतील बदल जाहीर करून आपल्या ग्राहकांना दिवाळीपूर्वीच जबरदस्त भेट दिली होती. (FD Interest Rate)

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचे (Fincare Small Finance Bank) नवे व्याजदर

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत (Fincare Small Finance Bank) वेगवेगळ्या कालावधीकरिता एफडीवर दिले जाणारे व्याजदर हे सामान्य नागरिकांना 7 ते 14 दिवसांसाठी 3 टक्के, 15 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के, 30 दिवसांच्या ठेवीवर 4.50 टक्के , 31 ते 45 दिवसांच्या FD वर 5.25, 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 5.76 टक्के, 91 ते 180 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के, 181 दिवस ते 365 दिवसांच्या FD वर 6.50 टक्के, आणि 12 ते 15 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के एवढा व्याज फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (FD Interest Rate) देत आहे.

‘या’ बँकासुद्धा देत आहे एफडीवर चांगला व्याजदर

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक व्यतिरिक्त, अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना FD वर आकर्षक व्याजदर देत आहेत. यात युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank) आहे, ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के एवढा व्याज देत आहे. तर सूर्योदय स्मॉल फायनान्स (Suryodaya Small Finance) बँकेने 9.1 टक्के, DCB बँक 8.50 टक्के, IDFC फर्स्ट बँक 8.25 टक्के RBL बँक 8.30 टक्के व्याज देत आहे. (FD Interest Rate)

सरकार देत आहे 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार; सरकारच्या या योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी क्लिक करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!