चिंताजनक..! औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या साडे पाचशेच्या पार..
ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी एकूण 573 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 94 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू तर 2,315 रुग्णांवर उपचार सुरू..
औरंगाबाद जिल्ह्यात आज 94 जणांना (मनपा 82, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 613 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 573 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 52 हजार 589 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 661 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण दोन हजार 315 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (382)
घाटी 1, पैठण रोड 1, एन-9 येथे 4, मिलिट्री हॉस्पिटल 2, टिळक नगर 1, सुतगिरणी चौक 3, एन-12 येथे 3, पवन नगर 1, आरेफ कॉलनी 3, मिटमिटा 2, सेवेन हिल्स 3, नंदनवन कॉलनी 2, पडेगाव 3, बेगमपुरा 1, कासलीवाल 7, गारखेडा परिसर 7, कैसर कॉलनी 10, एन-6 येथे 4, एन -4 येथे 5, एन-2 येथे 10, एन-3 येथे 4, एन -1 येथे 1, शेंद्रा एमआयडीसी 1, सातारा परिसर 3, संदेश नगर 1, पुंडलिक नगर 1, शिवाजी नगर 3, कासलीवाल पुर्व 1, उल्कानगरी 5, औरंगाबाद पोलीस पब्लिक स्कुल 9, अन्य 280
ग्रामीण भाग रुग्ण संख्या (191)
औरंगाबाद 58, फुलंब्री 8, गंगापूर 51, कन्नड 8, खुलताबाद 4, सिल्लोड 15, वैजापूर 25, पैठण 17, सोयगाव 5
मृत्यू (03)
घाटी (03)
1.51 पुरुष, नायगाव, ता.औरंगाबाद
2.78 पुरुष, चिखलठाणा ता.औरंगाबाद
3.65 स्त्री, नेवरगाव ता.गंगापूर