मुकेश अंबानी देत आहेत पेट्रोल पंप डीलर होण्याची संधी, जाणून घ्या कोण करू शकतात अर्ज..

तुम्हाला पेट्रोल पंप डीलर व्हायचे असेल तर तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे. Jio-BP तुम्हाला रिटेल आउटलेट डीलर बनण्याची ऑफर देत आहे. रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बीपी यांच्यातील संयुक्त उपक्रम, जिओ-बीपी ब्रँड नावाने कार्यरत आहे.

जिओ-बीपीने ऑक्टोबर 2021 मध्ये पहिले मोबिलिटी स्टेशन सुरू केले. Jio-BP रिटेल आउटलेटवर, ग्राहकांना इंधन, CNG, EV चार्जिंग, बॅटरी स्वॅप सोल्यूशन्स, सुविधा स्टोअर्स आणि कॅफे, सक्रिय तंत्रज्ञानासह एक्स्प्रेस ऑइल चेंजमध्ये प्रवेश मिळतो. जिओ-बीपी ग्रोथ उद्योजकांच्या शोधात आहे, खासकरून अशा व्यक्ती ज्यांच्याकडे महापालिका हद्दी/शहरी क्षेत्रे, राष्ट्रीय/राज्य महामार्गाच्या आसपास जमीन आहे.

Jio-BP डीलर होण्यासाठी महत्त्वाच्या अटी.

● स्वतःची जमीन (शहरी भागात- 1200 चौरस मीटर, राष्ट्रीय/राज्य महामार्ग – 3000 चौरस मीटर आणि इतर रस्त्यांभोवती 2000 चौरस मीटर)

● अंदाजे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक (गुंतवणुकीत जमिनीची किंमत समाविष्ट नाही. तसेच ती स्थानानुसार बदलू शकते.)

● जमिनीची लॉन्ग लीज.

कसा करालं अर्ज

● Jio-BP रिटेल आउटलेट डीलर होण्यासाठी, कोणीही https://partners.jiobp.in/ ला भेट देऊन नोंदणी करू शकतो आणि ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ सबमिट करू शकतो. हा एक फॉर्म आहे, ज्यामध्ये नाव, राज्य, जिल्हा, ठिकाण, ईमेल, मोबाईल नंबर असे विविध तपशील भरावे लागतात.

● अर्जदार [email protected] वर ईमेल देखील करू शकतात. किंवा ७०२१७२२२२२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘Hi‘ लिहून संपर्क साधू शकता.

Similar Posts