Jan Dhan Yojana in Marathi | जनधन बॅंक खाते उघडा आणि मिळवा 10 जबरदस्त सुविधा
Jan Dhan Yojana in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशातील नागरिकांसाठी जन धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. देशात या योजनेच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती झीरो बॅलन्स बँक अकाउंट सुरू करू शकते.
या योजनेमार्फत बँक खात्यांची संख्या चालू वर्षी जानेवारी 2022 मध्ये सुमारे 44.23 कोटी एवढी झाली होती. यातूनच ही योजना केवढी लोकप्रिय झाली हे समजतं. जन धन योजना देशातील नागरिकांसाठी महत्वकांक्षी ठरली आहे. ‘Pradhan Mantri Jan Dhan Yojana’
जनधन खाते हे झीरो बॅलन्स सेव्हिंग्स अकाउंट असल्याने खात्यामध्ये काहीच रक्कम नसली, तरी संबंधित बँक तुमच्याकडून कोणताही दंड आकारत नाही किंवा खातं बंद करत नाही. तसेच या योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्टची सुविधा, 1 लाखांचा अपघात विमा, 30 हजार रुपयांचा अपघाती मृत्यू विमा, रुपे डेबिट कार्ड अशा बऱ्याच सुविधा दिल्या जातात.
जन धन योजना देशातील नागरिकांसाठी फायद्याची ठरली आहे. या योजनेत लाभार्थ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. तुम्ही देखील जन धन योजनेत खातं ट्रान्स्फर करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 10 जबरदस्त सुविधा मिळणार आहेत. (Pradhan Mantri Jan Dhan Yojana Benefits)
जर जॉईंट पती-पत्नीचे जनधन खाते उघडले असेल, तर दोघांना 1 लाख रुपयांचा अपघाती विमा आणि 30 हजार रुपयांचा जीवन विम्याचा लाभ मिळतो. ही रक्कम दोघांना मिळते. तर दोघांपैकी एकाला ओव्हरडॉफ्टची सुविधा मिळते. ही सुविधा 5 हजार रुपयांपर्यंत असते. तर जन धन योजनेत खातं ट्रान्स्फर कसा करायचं जाणून घेऊ या.. (Jan Dhan Yojana 2022)
तुमचं खातं जन धन योजनेत असं करा ट्रान्स्फर..
जर तुमचं बँकेत अगोदरच बचत खातं असेल, तर ते जन धन खात्यात सहज ट्रान्स्फर करता येईल. जन धन खात्यात बचत खातं ट्रान्स्फर करण्यासाठी तुमच्याकडे रुपे कार्ड असणं आवश्यक आहे. नसेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागेल. यानंतर तुम्हाला खातं ट्रान्स्फर करता येईल. जन धन योजनेत खातं ट्रान्स्फर कोणत्या 10 सुविधा मिळतात जाणून घेऊ या..
‘या’ 10 सुविधा मिळतात..
कुटुंबातील दोन सदस्यांना जन धन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्स खातं उघडता येईल.
जनधन योजनेअंतर्गत रक्कम जमा आणि काढण्याची निशुल्क सुविधा मिळते.
मोफत खात्यातील शिल्लकी, जमा रक्कम तपासाता येईल.
रुपे डेबिट कार्डद्वारे बॅलेन्स चेक करता येईल.
मोफत मोबाईल बँकिंगची सुविधा दिल्या जाते.
तसेच मोफत मिनी स्टेटमेंट, खात्याचे विवरणपत्र मिळेल.
जन धन खात्याअंतर्गत एक लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल.
जन धन खातं उघडल्यानंतर, तुम्हाला बचत खातं देखील उघडता येईल. (Jan Dhan Yojana Benefits in Marathi)
जन धन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. देशात या योजनेला नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. जन धन खात्यात तुमचं खातं सहजपणे ट्रान्स्फर करून लाभ घेऊ शकता. (Jan Dhan Yojana Account Opening Online) ही माहिती नागरिकांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.
हे देखील वाचा-
शेतकऱ्यांनो! 50 हजार रुपये अनुदान मिळवण्यासाठी लवकर करा ‘हे’ काम