Bank of Maharashtra Bank Account Opening Online | बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेत घरबसल्या ऑनलाईन नवीन खाते असे उघडा, पासबुक आणि ATM कार्ड मिळेल
Bank Of Maharashtra Account Opening Online: बॅंक ऑफ महाराष्ट्रने नवीन ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरु केली असून, त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या बॅंकेत खाते उघडता येणार आहे. आपल्या नवीन ग्राहकांना घरबसल्या बॅंकेत खाते उघडता यावे, यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. त्यात ग्राहकांना ऑनलाईन बॅंकिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
ग्रामीण भागातही देखील ऑनलाईन सेवेचा प्रसार होत आहे. आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट आहे. याद्वारे घरबसल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेत ऑनलाईन नवीन अकाउंट ओपन करु शकता. बॅंकिंग सेवांचा लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे. bank of maharashtra account opening form online
बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेत ऑनलाईन खाते उघडल्यानंतर तुम्हाला बॅंक पासबुक आणि एटीएम कार्ड (ATM Card) दिल्या जाईल. खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत, ते मोबाईलमध्ये स्कॅन करुन ठेवावे. how to open bank of maharashtra account online
खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) कोऱ्या पेपरवर आपली सही करुन मोबाईलवर स्कॅन करा account opening online bank of maharashtra
account opening online असं उघडा बॅंक महाराष्ट्र बॅंकेत ऑनलाईन खाते
सर्वप्रथम बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेच्या https://bankofmaharashtra.in/savings-account या अधिकृत वेबसाईटवर जा.
वेबसाईट ओपन झाल्यानंतर, ‘Open Saving Account’ पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. येथे ‘Lets Go’ या पर्यायावर क्लिक करा.
आता भाषा निवडण्यासाठी पर्याय येईल, त्यामधून भाषा निवडून घ्या आणि ‘Next’ बटणावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
अर्ज भरल्यानंतर ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
फॉर्ममध्ये आपण ई-मेल दिलेला असतो. तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडीवर कस्टमर आयडी मिळेल, त्याची प्रिंट काढून ठेवावी.
ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर, आधार कार्ड व पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन आपण निवडलेल्या बॅंक शाखेत जमा करावी.
यानंतर तुम्हाला बॅंकेत जावे लागेल. बॅंकेतून तुम्हाला पासबुक आणि ATM कार्ड दिल्या जाईल.
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज