30 हजार पगार, 40 लाख रुपयांचे इन्शूरन्स आणि 4 वर्ष नोकरी! अग्निवीरांना आणखी काय काय मिळणार? जाणून घ्या..
Agneepath Recruitment Scheme : अनेक तरुणांचे देशासाठी काम करण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते निरनिराळ्या संधीच्या शोधात असतात, आणि ते वेग-वेगळ्या योजनाही बघत असतात. याकरिता वेग-वेगळे प्लॅटफॉर्म देखील उपलब्धआहे. मात्र, आम्ही तुम्हालाअगदी सोप्या शब्दात भारतीय सैन्यदलाच्या एका खास योजनेची माहिती देणार आहोत.
भारतीय सशस्त्र दलामध्ये भरतीकरीता एक नवीन योजना सुरू होणार आहे. त्या योजनेला टूर ऑफ ड्युटी ‘अग्निपथ’ असे नाव देण्यात आले आहे. एक वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ही योजना सुरू आहे. याअंतर्गत चार वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाईल, ज्यांना अग्निवीर म्हटले जाईल. ही भरती आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमधील अधिकाऱ्यांच्या पदापेक्षा कमी असेल. याअंतर्गत 21 वर्षांपर्यंतच्या तरुणांना घेण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या काळात लष्करातील भरतीची प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून थंडावली होती. त्यामुळे ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. Agneepath Recruitment Scheme :
10 मुद्द्यात समजून घ्या काय आहे योजना
▪️या योजनेंतर्गत तरुण सैनिकांना चार वर्षांसाठी भारतीय लष्करात कामावर घेतले जाईल.
▪️चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर 25 टक्के सैनिकांचे पुनर्मूल्यांकन केले जाईल
▪️त्यांना पुन्हा सैन्यात सामील होण्यासाठी विचार केला जाईल.
▪️या योजनेसाठी 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांची भरती करण्यात येणार असल्याची सूत्रांती माहिती आहे
▪️अर्जदारांच्या विद्यमान पात्रतेच्या आधारे आणि चाचणीद्वारे भरती केली जाईल.
▪️सहा महिन्यांच्या अंतराने शिपाई भरती वर्षातून दोनदा केली जाईल
▪️सहा महिन्यांचे प्रशिक्षण मिळेल, त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी सैन्यात नियुक्त केले जाईल
▪️यामध्ये तज्ज्ञांच्या कामाचाही समावेश असेल.
▪️या नवीन योजनेअंतर्गत ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते
▪️पहिल्या टप्प्यात सुमारे 45 हजार तरुणांची भरती करण्यात येणार आहे.
काय म्हणालेत संरक्षण मंत्री?
▪️या योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना सुरुवातीचे 30 हजार रुपये वेतन देण्याचा प्रस्ताव
▪️चौथ्या वर्षाच्या अखेरीस 40 हजार रुपये करण्यात येईल, 44 लाखांचा इन्शूरन्स देखील असल्याची सूत्रांची माहिती
▪️सेवा निधी योजनेंतर्गत या पगारातील 30 टक्के रक्कम बचत स्वरूपात ठेवण्याची योजना आहे
▪️सरकारही दर महिन्याला तेवढीच रक्कम देणार आहे
▪️चार वर्षे पूर्ण झाल्यावर या जवानांना 10 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाईल
▪️या सैनिकांना पेन्शन मिळणार नाही. ज्या सैनिकांना आणखी १५ वर्षे ठेवले जातील केवळ त्यांनाच सेवानिवृत्तीचा लाभ मिळू शकेल.
▪️चार वर्षांच्या सेवेनंतर या सैनिकांना सामान्य जीवनात स्थायिक होण्यासाठी सरकारही मदत करेल
▪️त्यांना सेवेसाठी डिप्लोमा प्रमाणपत्र दिले जाईल, जे त्यांना पुढील नोकरी शोधण्यात मदत करेल. सेवेतील कौशल्याच्या आधारे हे प्रमाणपत्र दिले जाईल.
बिपिन रावत यांनी तयार केली योजना
या योजनेची ब्लू प्रिंट तत्कालीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी 2020 मध्येच तयार केलेली होती. सैनिकांची कमतरता भरून काढणे, सैन्याच्या पेन्शनवरील खर्चात कपात करणे आणि तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे