AIIMS मध्ये या उमेदवारांना सरकारी नोकरी ची संधी; दरमहा मिळेल 67,700 रुपये पगार.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने वरिष्ठ निवासी पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार AIIMS रायपूर भर्ती 2022 साठी अधिकृत वेबसाइट aiimsraipur.edu.in द्वारे 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.

अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे वरिष्ठ निवासींच्या एकूण 132 रिक्त पदांची भरती केली जाईल. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 39 पदे, इतर मागासवर्गीयांसाठी 44 पदे, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 24 पदे, आर्थिक दुर्बल घटकासाठी 12 पदे, आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 13 पदे आहेत. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,700 रुपये पगार दिला जाईल.

वरिष्ठ निवासी पदावरील भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय या पदांसाठी भरतीसाठी उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

मुलाखतीच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व पात्र उमेदवार AIIMS वरिष्ठ निवासी भरती 2022 साठी अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या Google फॉर्म लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी सामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये आणि SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 800 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

Similar Posts