‘जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी ठार…

जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेला अल-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला अमेरिकेने ठार केले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल जवाहिरी मारला गेला. हा 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जात होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. जो बिडेन यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील काबुलमध्ये यशस्वी ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी मारला गेला. आता न्याय मिळाला असल्याचे ते म्हणाले.

अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरी मारला गेला

रविवारी CIA ने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये ड्रोन हल्ला केला. बिडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये अल कायदाविरोधात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली आणि ही कारवाई पूर्णपणे यशस्वी झाली आहे. या कारवाईत दुसरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचा दावाही अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे. अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरीचे नाव एफबीआयने मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. हा 9/11 हल्ल्याचा मास्टर माईंड असल्याचे बोलले जात आहे. या दहशतवादी घटनेत 3,000 लोक मारले गेले.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 31 जुलै रोजी जवाहिरी त्याच्या काबुलच्या निवासस्थानाच्या बाल्कनीत होता तेव्हा त्याला दोन हेलफायर क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले होते.

काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष जो बिडेन?

अल-कायदा प्रमुख अयमान अल-जवाहिरीच्या हत्येवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन पुढे म्हणाले की अमेरिका आपल्या नागरिकांचे संरक्षण करत राहील. आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध आम्ही आमचा संकल्प आणि क्षमता दाखवत राहू, असे ते म्हणाले. आज आम्ही ते साफ केले आहे. कितीही वेळ लागला तरी चालेल. तुम्ही कुठे लपण्याचा प्रयत्न करत आहात हे महत्त्वाचे नाही, आम्ही तुम्हाला शोधूनच काढू.

Similar Posts