Axis Bank : अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! Axis बँकेत तुमचे खाते असेल तर वाचा ‘ही’ बातमी…
Axis Bank : मागील काही काळापासून ऑनलाइन अथवा फोन कॉलद्वारे फसवणुकीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. बऱ्याचदा बँक कर्मचारी असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे. हे घोटाळेबाज आपण खोटे बँक कर्मचारी असल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करतात किंवा त्यांच्या खात्यासंबंधित काही समस्या असल्याचे सांगून त्यांना आधी घाबरवतात आणि नंतर त्यांची वैयक्तिक माहिती घेऊन त्यांचे पूर्ण खाते रिकामे करतात.
याच दरम्यान, सरकार/रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तसेच बँकांनी वेळोवेळी अशा फसवणुकीबद्दल जनजागृती करत आहे. या संदर्भात, अॅक्सिस बँकेने सुद्धा त्यांच्या ग्राहकांना अशा प्रकारच्या फसवणूकीपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
Get Easy Loan Click Here
या गोष्टी ध्यानात ठेवून स्वतःला सुरक्षित ठेवा (Axis Bank) –
- अॅक्सिस बँकेचे कर्मचारी कधीच फोन करून त्यांच्या ग्राहकांकडून KYC, OTP, डेबिट कार्डची पिन किंवा CVV विचारत नाहीत, कॉलवर कोणत्याही व्यक्ती बरोबरच तुमचे kyc तपशील जसे की पॅन नंबर, आधार नंबरकिंवा तुमची जन्मतारीख शेअर करू नका.
- ज्या नंबरवरून तुमच्या मोबाईलवर कॉल आला आहे त्याची खात्री करून ते तपासा, की हा नंबर खरोखरच बँकेचा ग्राहक सेवा क्रमांक आहे की नाही याची क्रॉस-तपासणी करा.
- तुमच्या मोबाइलच्या कॉलर आयडीवर पूर्णपणे विश्वास ठेऊ नका.
- मोबाइल क्रमांक बदलण्याच्या कोणत्याही विनंतीला बळी पडू नका, Axis बँकेचे कर्मचारी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर अपडेट करण्याचा सल्ला कधीही देत नाहीत.
- ग्राहक समर्थन अथवा कॉल सेंटर नंबर मिळविण्यासाठी नेहमी कंपनीची अधिकृत वेबसाइटच तपासावी.
- कोणतेही third party app जसे की, एनी डेस्क, टीम व्ह्यूअर अथवा क्विक सपोर्ट सारखे तृतीय-पक्ष एप्लीकेशन डाउनलोड करू नका.
फसवणूक झाल्यावर काय कराल?
जर एखाद्याने तुमची फसवणूक करून तुमच्या बँक खात्यातून पैसे उडवले असतील तर लगेच तुमच्या बँकेला याची माहिती द्या.
या फसवणुकीची तक्रार करण्याकरिता तुमचे डेबिट कार्ड किंवा खाते ब्लॉक करण्याकरिता, Axis Bank ग्राहक सेवा क्रमांक 1860 419 5555, 1860 500 5555 वर कॉल किंवा WhatsApp वर ‘हाय’ पाठवा. WhatsApp नंबर 70361655000.