Best Diploma Courses: विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! ‘हे’ डिप्लोमा कोर्सेस करून नोकरी मिळवा..

Best Diploma Courses

Best Diploma Courses: शिक्षण हा भविष्य उज्वल बनविण्यासाठी एकमेव मार्ग मानला जातो. पण अनेकांना समजत नाही पुढे काय करावे. विद्यार्थ्यांसाठी असे अनेक शैक्षणिक कोर्स त्यामार्फत त्यांचं भविष्य उज्ज्वल करू शकतात. तुमची जर 12वी पूर्ण झालेली असेल, तर तुमच्यासाठी शॉर्ट टर्म कोर्सविषयी माहिती घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचं कमी काळात उज्ज्वल भविष्य होईल.

तुम्हाला असे शॉर्ट टर्म डिप्लोपा कोर्स सांगणार आहे, ज्यामुळे भरपूर साऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. हे कोर्स तुम्ही कमी कालावधीत पूर्ण करून तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकाल. तर हे 5 शॉर्ट टर्म डिप्लोमा कोर्सेस कोणते आहे तसेच या कोर्सेसची माहिती जाणून घेऊ या.. (Best Diploma Courses After 10th)

Nutrition and Dietician Diploma Course

Nutrition and Dietician म्हणजेच आहार तज्ज्ञ.. आहार तज्ज्ञ हे आरोग्य क्षेत्राशी संबंधित एक व्यावसायिक आहे, जे निरोगी राहण्यासाठी लोकांना खाणे-पिण्यासाठी योग्य सल्ला देण्याचे कार्य करते. या क्षेत्रात करियर बनवायचे असेल, तर तुम्हाला एका चांगल्या कॉलेज किंवा संस्थेकडून 3 वर्षांचा कोर्स करावा लागेल. (Nutrition and Dietician Course in Marathi)

Interior Designing Diploma Course

इंटिरिअर डिझायनिंग म्हणजे अंतर्गत सजावट. मुळात डिझायनिंग हे अत्यंत व्यापक असं क्षेत्र. इंटिरिअर डिझायनिंग ही या क्षेत्रातली एक शाखा. इंटिरिअर डिझायनिंगच्या क्षेत्राची निवड करण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली नाही. दहावी किंवा बारावीनंतर किंवा पदवी मिळवल्यानंतरही डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तम करिअर घडवता येईल.

Animation आणि VFX Diploma Course

ॲनिमेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस ला एका विशिष्ट पद्धतीने ठेवून त्या इमेजेस मोशन मध्ये आहे असा भास समोर असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण करणे असा होतो. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर टॉम अँड जेरी, छोटा भीम, डोरामॉन या कार्टूनलाच ॲनिमेशन म्हणतात. तुम्हाला करिअर करायचे असेल, तर ॲनिमेशन आणि VFX डिप्लोमा कोर्स हा एक वर्षाचा असतो. विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळविण्याकरिता कमीत कमी दहावी पास असणं आवश्यक असते.

Jewellery Designing Diploma Course

ज्वेलरी डिझायनिंग हे कल्पक असं क्षेत्र आहे. येथे काम करताना दागिन्यांच्या विविध डिझाइन्स बनवण्याचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच ते दागिने त्याच प्रकारे बनवून घेण्याची माहिती देखील तुम्हाला असायला हवी. हा डिप्लोमा कोर्स करायचा असेल, तर किमान दहावी-बारावी पासण असणं आवश्यक आहे. (Diploma Courses Information in Marathi)

Fashion Designing Diploma Course

फॅशन डिझायनिंग हे मानवतेचे एक वैशिष्ट्य आहे जे फॅब्रिक शैली, नमुने, रंग आणि विशिष्ट युगाची फॅशन परिभाषित करणारे एक क्षेत्र आहे. फॅशन डिझायनर कोर्सला चांगलीच डिमांड आहे. हा डिप्लोमा कोर्स तुम्हाला करायचा असेल, तर दहावी-बारावी पासण असणं आवश्यक आहे. फॅशन डिझायनिंग कोर्स हा 1 वर्षांपासून ते 4 वर्षांपर्यंत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!