पैठण येथील भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर CBI ची छापेमारी; अवघ्या काही तासात तोतया अधिकारीच पोहोचला तुरुंगात..!

  • पैठण माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांच्या सोने-चांदी च्या दुकानावर तोतया CBI अधिकारी म्हणून धाड टाकण्यासाठी आलेल्या टोळीच्या एका सदस्याला पैठण पोलिसांनी घेतले ताब्यात, तीन जण फरार असल्याची माहिती.
  • आपण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (CBI) अधिकारी असून छापा टाकायचा नसेल तर 50 लाखांची मागणी पैठण येथील एका सराफा व्यावसायिकाकडे मागणाऱ्या तोतया टोळीला पैठण पोलिसांनी रविवारी पकडले. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.

संभाजीनगर : (औरंगाबाद) मध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षावर CBI ची रेड पडल्याची बातमी पसरताच पैठण मध्ये एकच खळबळ उडाली. पण प्रत्यक्षमध्ये CBI अधिकाऱ्यांची ती टीमच स्पेशल छब्बीस या चित्रपटाप्रमाणे बोगस निघाली. त्यामुळे संपूर्ण संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात तोतया CBI ची जोरदार चर्चा सुरू आहे.

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र शासनाची मोठी योजना..!

सविस्तर बातमी अशी की, संभाजीनगर (औरंगाबाद) च्या पैठण तालुक्यामधील माजी नगराध्यक्ष तथा भाजपाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे यांच्या दुकानावर CBI च्या अधिकाऱ्यांची रेड पडल्याचे वृत्त समोर आले. मात्र या तोतया CBI अधिकाऱ्यांच्या हालचालीवर संशय आल्याने सूरज लोळगे यांनी सदरील प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून चौकशी केली असता हा CBI अधिकारी तोतया असल्याचे समोर आले. त्यानंतर CBI चे या तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये असताना हातामध्ये फाइल व डायरी घेऊन तोतया CBI अधिकारी विठ्ठल हरगुडे दुकानात आला. त्यानंतर त्याने आपण CBI अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या दुकानावर रेड पडली असल्याचे सुरज लोळगे यांना सांगितलं. पण विठ्ठल हरगुडे बोलण्यावरून सुरज लोळगे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लगेच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना माहिती दिली.

पोलिसांनी ज्वेलरी शॉपमध्ये येऊन तोतया CBI अधिकाऱ्याची विचारपूस करून चौकशी केली असता त्याचे ओळखपत्र आणि अधिकारी दोन्ही नकली असल्याची खात्री पोलिसांना झाली. नंतर पोलिसांनी तोतया CBI अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन ज्वेलरी शॉपचे मालक सुरज लोळगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी विठ्ठल हरगुडे

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र शासनाची मोठी योजना..!

त्यामुळे स्पेशल छब्बीस या चित्रपटाप्रमाणे संभाजीनगर (औरंगाबाद)मध्ये या तोतया CBI अधिकाऱ्याने लुटण्याचा प्रयत्न तर केला मात्र, त्याला आता पोलीस ठाण्याची हवा खावी लागली आहे. या घटनेमुळे संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!