रस्त्यावरील सर्व टोलनाके हटवले जाणार, भारत सरकार उचलणार मोठे पाऊल..
वाहन-धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने वाहन मालकांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून येणाऱ्या काळात रस्त्यावरील सगळी टोलनाके हटवण्यात येणार आहेत..! मात्र, महामार्गावरील टोलनाके हटवले जाणार असले, तरी तुमचा खिशा मात्र कापला जाणार आहेच..! ते नेमकं कसं, हे समजून घ्या..
रस्ते वाहतूक आणि महामार्ग (MoRTH) मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आता लोकांना राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही आणि रस्त्यावर टोल प्लाझा दिसणार नाही. भारत सरकार आता जीपीएस-आधारित ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे चालकांकडून टोल वसूल करणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत जे काम केले आहे ते कदाचित यापूर्वी कधीही झाले नसेल. याचे संपूर्ण श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाते. गडकरी सातत्याने मोठी पावले उचलत आहेत आणि रस्त्यांपासून सुरक्षेपर्यंतची सर्व कामे बळकट करण्याकडे लक्ष देत आहेत. आता नितीन गडकरी यांनी संसदेत सांगितले आहे की सरकार लवकरच जीपीएस आधारित टोल ट्रॅकिंग सिस्टीम आणणार आहे, त्यानंतर जनतेला टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही. जीपीएस इमेजिंगद्वारे टोलची रक्कम वसूल केली जाईल.
सर्व टोल हटवले जातील – नितीन गडकरी
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, येत्या काही दिवसांत सर्व टोलनाके हटवले जातील, म्हणजेच आता रस्त्यावर एकही टोल नाका नसेल. वाहनांकडून टोल वसूल करण्यासाठी जीपीएस आधारित ट्रॅकिंग यंत्रणा तयार करण्यात येत आहे. यामध्ये तुम्ही टोल प्लाझा ओलांडताच तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल. यासाठी सरकार लवकरच धोरण आणणार आहे.
GPS इमेजद्वारे टोल वसूल केला जाईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही भारतातील टोल प्लाझाच्या जागी जीपीएस आधारित ट्रॅकिंग सिस्टीम आणण्यासाठी नवीन धोरण आणणार आहोत. याचा अर्थ टोल वसुली आता जीपीएसद्वारे होणार आहे. टोल कर संकलन आता जीपीएसद्वारे होणार आहे. “गडकरींनी ट्विटरवर सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक ६० किमीवर जनतेच्या सोयीसाठी एक टोल प्लाझा असेल, याशिवाय यादरम्यान आढळणारे सर्व टोल येत्या तीन महिन्यांत हटवले जातील. विशेष म्हणजे टोलची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सोपी आणि कमी वेळ घेणारी झाली असून, टोल हटवल्यास प्रवाशांना कुठेही थांबावे लागणार नाही.