Farmer Bonus | शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15 हजार रुपये बोनस, त्यासाठी येथे करा नोंदणी

Farmer 15000Rs Bonus: शेतकऱ्यांसाठी सरकार विविध निर्णय घेत असते. हे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत तसेच अधिवेशनात घेतले जातात. आत्ताच काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी जबरदस्त घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकार विविध निर्णय घेत असते. Government Scheme मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला.

Farmer Bonus धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या बोनसचा लाभ राज्यातील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. बोनसची ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यावर पाठवली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Dhan Bonus Maharashtra)

शेतकऱ्यांना या बोनसचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर नोंदणी करावी लागणार आहे. असे असले तरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणीच केली नाही. (Dhan Bonus Maharashtra 2023)

अनेक शेतकऱ्यांनी अगोदर नोंदणी केलेली नव्हती. आणि हिवाळी अधिवेशनादरम्यान शासनाने धानाला हेक्टरी 15 हजार रूपये बोनस जाहीर केल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली होती. मात्र, धानाला बोनस जाहीर झाल्याच्या दिवसीच शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नोंदणीची मुदत संपली होती. त्यामुळे बोनस जाहीर केल्यानंतर परत नोंदणी करण्यासाठी वाढ दिली.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!