महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र शासनाची महिलांसाठी मोठी योजना !

महिलांच्या हितासाठी आणि सक्षमीकरणाकरीता केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनेमध्ये इच्छुक महिलांना रोजगार देण्याकरिता आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी भारत मोफत सरकार शिलाई मशीन देत असून केंद्र सरकारतर्फे मोफत शिलाई मशीन मिळवून या महिला घरबसल्या आपला व्यवसाय सुरू करून दोन पैसे कमावू शकता. मोफत शिलाई मशीन 2024 योजने अंतर्गत देशातील सर्व राज्यातील जवळपास 50 हजारांपेक्षा अधिक महिलांना मोफत शिलाई मशिन दिली जातात. या योजनेअंतर्गत 20 ते 45 वर्षे वयोगटातील महिला अर्ज करून शिलाई मशीन मोफत मिळवू शकता.

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे
मोफत शिलाई मशीन योजना 2024 चा मुख्य उद्देश असा आहे – देशातील ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब आहे, त्यांना केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे असा आहे. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी निर्माण करून देता येईल आणि त्यांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले उत्पन्न मिळू शकेल. महिलांना मोफत शिलाई मशीनचा लाभ केंद्र सरकारकडून महाराष्ट्र (Maharashtra), उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमधील महिलांना दिला जात आहे

अर्ज कसा करायचा
या योजनेंतर्गत इच्छुक कामगार महिला (Working women) ज्यांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे, त्यांना सर्वप्रथम भारत सरकारच्या www.india.gov.in या वेबसाइटला भेट दिल्यानंतर त्यांना तेथून अर्ज डाऊनलोड करावा लागेल. अर्ज डाउनलोड केल्यावर त्यांना अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती बिनचूक भरावी लागेल जसे की त्यांचे नाव, राहण्याचा पत्ता, आधार लिंक असलेला मोबाइल नंबर, आधार क्रमांक ही सर्व माहिती भरल्यावर, त्यांना मागितलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत फोटो कॉपी संलग्न करून संबंधित कार्यालयाला भेट द्यावी लागतील. त्यानंतर त्यांच्या अर्जाची पडताळणी कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येईल. पडताळणी केल्यावर कामगार महिलाना मोफत शिवणकामाचे मशीन दिले जाईल.

सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे तुमच्या अर्जासोबत फोटो कॉपी जोडून संबंधित कार्यालयाला भेट द्यावी लागतील. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल. पडताळणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत शिवणकामाचे मशीन दिले जाईल.

Similar Posts