PM Kisan yojana 15th Installment : केंद्र सरकारतरफ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमार्फत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. सदरील योजना केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 14 हप्ते मिळाले असून शेतकरी आता 15व्या हप्त्याच्या दोन हजार रुपयांची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडियाने जारी केलेल्या रिपोर्ट्सनुसार, १५वा हप्ता १५ नोव्हेंबर २०२३ बुधवार रोजी शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

PM Kisan yojana 15th Installment या योजनेच्या सुरुवातीपासून ते आता पर्यंत एका लाभार्थ्याला एकूण २८००० रुपये त्यांच्या खात्यात प्राप्त झाले आहेत. जर तुम्हीही पीएम किसान योजनेच्या १५व्या हप्त्याची वाट पाहात असाल, तर लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही याचा तपास करणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी माहिती शोधण्यासाठी पीएम किसान वेबसाइटवर जाऊ शकतात.
PM Kisan yojana 15th Installment लाभार्थ्याच्या यादीमध्ये नाव कसं शोधालं?
- जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी प्रथम पीएम किसान योजनेची वेबसाईट https://pmkisan.gov.in/ वर भेट द्यावी.
- पेमेंट सक्सेस या टॅबच्या खालील बाजूस भारताचा नकाशा दिसेल.
- नकाशाच्या उजव्या बाजूस डॅशबोर्डवर क्लिक करा.
- डॅशबोर्ड ओपन केल्यावर तुमच्या मोबाईल/ कंप्युटरच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या पेजवर तुम्हाला विचारलेली आवश्यक ती माहिती भरावी लागेल.
- नंतर तुमचे राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि ग्रामपंचायत निवडावा लागेल
- सर्व माहिती भरल्यानंतरतुम्ही तुमची माहिती तपासून पाहू शकता.
पीक वीमा पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.
लाभार्थी शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास ते ईमेलद्वारे [email protected] या ईमेल आयडी वर संपर्क साधू शकतात. याशिवाय, त्यांना मदतीसाठी पीएम शेतकरी योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचा पर्याय आहे. PM Kisan yojana 15th Installment

योजनेची स्थिती अशी पाहा
- प्रथम पीएम किसानच्या वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ भेट द्या.
- नंतर तुमची स्थिती जाणून घ्या या वर क्लिक करा.
- नंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून Get Data वर क्लिक करा
- तुमच्या स्क्रीनवर तुमची स्थिती दिसेल.
- राशीभविष्य : २८ नोव्हेंबर २०२३ मंगळवार
- राशीभविष्य : २६ नोव्हेंबर 2023 रविवार
- राशीभविष्य : २५ नोव्हेंबर २०२३ शनिवार
- राशीभविष्य : 24 नोव्हेंबर
- Poultry Farm yojana : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी मिळत आहे 50 लाख रुपये, ते सुद्धा 50 टक्क्यांच्या सबसिडीसह; केंद्र सरकारच्या या योजनेबद्दल माहिती आहे का?