Land records : 1880 पासूनचे जमिनीचे पूर्ण उतारे फक्त पाचच मिनिटांत मोबाईलवर डाऊनलोड करा..

Land records 1880: शेतकऱ्यांकरिता शेत जमीनीचा विषय हा अत्यंत भावनिक विषय असतो, त्यामुळेच तर बऱ्याचवेळा शेतीच्या बांधा बांधावरून वाद सुद्धा होतात. मात्र, यापूर्वी जमीनीच्या सातबारामध्ये काही बदल अथवा फेरफार झाले असतील तर ते पाहण्याकरिता प्रशासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागायच्या. मात्र, आता हे सर्व चुटकी वाजवण्या एवढे सोपे आणि सरळ झाले आहे. आता आपण आपल्या मोबाईलवरच सन 1880 पासून ते आतापर्यंतच्या जमीनीचे सर्व जून्यात-जुने सातबारा/फेरफार नक्कल अगदी पाहू शकतो.

Land records

डिजीटल भारत या योजनेतंर्गत सर्व प्रशासकीय कागदपत्रांची कामे कम्प्युटरवर म्हणजेच संगणकावर डिजिटल करण्याचा भारतीय केंद्र शासनाचा निर्णय जिल्हा आणि तालुका पातळीवर अगदी जोरात राबवला जात आहे. आणि त्याचेच फलीत म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्याच जमीनीच्या सातबारामध्ये जुन्या काळी केलेले फेरफार (Land records) अगदी घरबसल्या डाऊनलोड करता येणार आहेत.

Land records : 1880 पासूनचे जमीनीच्या सातबाऱ्यातील फेरफार पाण्यासाठी पुढील प्रक्रीया पाहण्यासाठी पुढील साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही जमीनीच्या सातबाऱ्यातील फेरफार पाहू शकता.

Land records
  • सर्वप्रथम aapleabhilekh.mahabhumi.gov.in ही वेबसाईट उघडा.
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर समोरील पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents) या पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यावर “महाराष्ट्र शासन–महसूल विभाग’चे पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • त्या पेजमध्ये उजव्यासाईडला “भाषा’ या पर्यायावर क्लिक करून मराठी भाषेचा पर्याय निवडाल्यावर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट मराठीत ओपन होईल..
  • या वेबसाईटवर लॉगीन आयडी बरोबरच पासवर्ड प्रविष्ट करून तुमच्या नावाची नोंदणी अर्थातच रजीस्ट्रेशन करावा.
  • रजीस्ट्रेशन करत असताना तुम्हाला विचारलेली वैयक्तिक माहिती भरावी जसे की, तुमचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव, तुमचे आडनाव, लिंग, तुमचे राष्ट्रीयत्व, आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर ई..
  • या व्यतिरिक्त तुमची इतर माहिती सुद्धा त्यात भरायाची आहे. म्हणजेच तुम्ही कोणता व्यवसाय करता, तुमची ईमेल-आयडी, तुमची जन्म तारीख ही वैयक्तिक माहिती भरल्यावर सविस्तर पत्त्याविषयीचा कॉलम भरून पुढे Captcha चौकटीत Captcha टाईप करूम सबमिट बटणवर क्लिक करा.

पीक वीमा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या संकेस्थळावर सात जिल्ह्यांपैकी तुमचा एक जिल्ह, नंतर तुमचा तालुका, नंतर तुमच्या गावाचं नाव, नंतर अभिलेखाचा प्रकार, फेरफार नक्कल, सातबारा उतारा, ८-अ यापैकी जो कागदपत्र तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे तो पर्याय निवडा. (असे जवळपास अठ्ठावन्न अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध करण्यात आलेले आहेत)

नंतर तुमच्या शेतीचा गट क्रमांक प्रविष्ट करून ‘शोध’ या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित असलेल्या जमिनीच्या फेरफार बद्दलची माहिती दिसते. त्यामध्ये जमीनीच्या सातबाऱ्यात फेरफार केलेले वर्ष आणि अनुक्रमांक दिलेला असतो. त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला ज्या वर्षाचा फेरफार नक्कल डाऊनलोड करायचा असेल तो तुम्ही डाऊनलोड शकता.

ऑनलाईन 1880 चे Land records पाहण्याचे फायदे

जमीनीची खरेदी-विक्री करणाऱ्यांकरीता अत्यंत सोयीचे
जमीनीच्या सातबाऱ्यामध्ये करण्यात आलेले फेरफार हे शेतकऱ्यांना तर पाहणे गरजेचे आहेच, त्याचबरोबर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करायचा आहे अशा नागरिकांना सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची वेबसाईटची ही सेवा खूपच उपयोगी असून यामुळे शेतकरी आणि जमीनीची खरेदी-विक्री करणाऱ्यांना शासकीय कार्यालयांत माराव्या लागणाऱ्या फेऱ्या, वेळ आणि पैसा देखील वाचला.

भ्रष्टाचाराला बसला आळा

शासनाने सर्वसाान्यांसाठी 1880 पासूनचे Land record पाहण्याकरिता खुले केल्यामुळे अनेक फायदे होत आहे, त्यातलाच सर्वात मोठा फायदा म्हणजे जमीनीच्या सातबाऱ्यामध्ये झालेले जुने फेरफार ऑनलाईन प्रकारे उपलब्ध करुन देऊन सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम केले आहेे.

कारण शासकीय कार्यालयांमध्ये जमीनीच्या फेरफेरासंबंधीची माहिती काढून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अधिकारी वर्ग बरेचदा या अतीरीक्त पैशांची मागणी करायचे, आणि जे शेतकरी त्यांना पैसे द्यायचे केवळ त्यांनाच सातबाऱ्यातील फेरफार Land record संबंधी कागदपत्र देण्यात येत असत आणि जे शेतकरी अधिकाऱ्यांना पैसे देत नव्हते, त्यांना मात्र जमीनीच्या सातबाऱ्यातील केलेले फेरफार land record पाहता येत नसत. मात्र, आता तसे नाही. कोणीही केव्हाही ज्यांच्या त्यांच्या मोबाईल अथवा संगणकावर 1880 पासूनचे Land record अर्थातच जमीनीच्या सातबाऱ्यासाबंधी झालेले फेरफार पाहू शकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!