रेल्वे स्टेशनवर प्रेमी युगुलचा किसिंगचा कहर, मुंबईतल्या त्या जोडप्याची जोरदार चर्चा; जीआरपीकडून गुन्हा दाखल..

काही दिवसापूर्वी औरंगाबाद शहरातील जालना रोडवर चालत्या बाईकवर प्रेमी युगुल रोमान्स (Couple Kissing ) करत असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल ( Viral Video ) झाला होता.

आता ठाणे जिल्ह्यामधील डोंबिवली रेल्वे स्टेशनवर प्रेमी युगुल रोमान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी डोंबिवली GRP मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

भर दिवसा रेल्वे स्टेशनवर प्रेमी युगुल एकमेकांच्या मिठीत शिरुन किसिंग करत असल्याचे पाहून प्रवाशांच्याही भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे काही प्रवाशांनी हा रोमान्स आपल्या कॅमेरात कैद करत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

व्हिडीओ मध्ये काय ?

रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला कडेला उभे राहून एक प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारत चुंबन घेत आहेत, असे या व्हिडीओमध्ये दिसतं.

21 सेकंदांच्या या व्हिडीओत स्टेशनवरील अनाऊन्समेंटही ऐकू येते. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेली लोकल 11 वाजून 4 मिनिटांची.. इतक्या उद्घोषणेनंतर व्हिडीओ थांबतो.

डोंबिवलीतमध्ये सार्वजनिक स्थळी असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. कोणी यावर टीका करताना दिसत आहे, तर कोणी या व्हिडीओमध्ये गैर काय, असा सवाल विचारत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!