Land Registration | जमीन तुमच्याच मालकीची आहे; ‘या’ 7 पुराव्याने सिद्ध होणार

Land Registration

Land Registration: गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे, शेतजमीन.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये शेतीजमिनीवरून वाद होतो. हा वाद कधी इतका विकोपाला जातो, की त्यातून मारामाऱ्या होतात. अगदी खून करण्यापर्यंतही काहींची मजल जाते.. नि त्यातून कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जातं..

अनेकवेळा असं होतं की, जमीन करणारा एक पण मालक मात्र दुसराच असतो. यामुळे वादविवाद होण्यास सुरुवात होते. परंतु, तुम्ही हे कसे सिद्ध करणार की जमीनाचा मालक कोण आहे. यासाठी तुम्ही महत्वाचे 7 पुरावे देऊन, जमीन तुमचीच आहे सिद्ध करू शकता. हे पुरावे कोणते आहे सविस्तर जाणून घेऊ या..

जमीन खरेदी खत Land Registration and land sale deed

जमीन तुमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी पहिला पुरावा जमीन खरेदी खत Land sale deed.. खरेदी खत म्हणजे काय तर जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा. यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती असते. खरेदी खत झाल्यानंतर ही माहिती फेरफारवर येते‌ आणि पुढे 7/12 उताऱ्यावर नोंद होते. (Land Registration)

Solar Rooftop Online Application | राज्य सरकार देणार प्रत्येक घरावर मोफत सोलर. फक्त असा करा अर्ज

Solar Rooftop Online Application घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज

जमिनीचा 7/12 उतारा land registration documents

शेतकऱ्याच्या जमिनीची सारी कुंडली सातबारा उताऱ्यावर असते. त्यामुळेच या सातबारा उताऱ्याला जमिनीचा आरसा असं म्हटलं जाते. शेतीबाबतची संपूर्ण नोंद या सातबारा उताऱ्यावर असते. सातबारा उताऱ्यावर भूधारण पद्धती असते ज्यामुळे जमिनीचा खरा मालक कोण, हे जाणून घेण्यास मदत होते. (land registration documents)

भोगवटदार वर्ग 1 – जर सातबारा उताऱ्यावर भोगवटादार वर्ग-1 पद्धत असेल, तर भोगवटादार वर्ग-1 या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
भोगवटदार वर्ग 2 – ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार बहाल केला नाही, असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. यामध्ये जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीविना या जमिनींचं हस्तांतर होत नाही.

8-अ उतारा

8-अ उताऱ्यात गावामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालकीची किती एकूण किती जमीन आहे याची माहिती हा उतारा देतो. एखाद्या व्यक्तीची गावामध्ये एका पेक्षा जास्त ठिकाणी जमीन असेल, तर त्याची सर्व माहिती तुम्हाला या उताऱ्यावर मिळून जाईल. (Land Registration in Maharashtra)

शेतजमीन नकाशा

यामधील तिसरा पुरावा शेतजमीन नकाशा.. शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्द जाणून घ्यायची असेल, तर शेतकऱ्यांकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं गरजेचं असते.

प्रॉपर्टी कार्ड

जसे साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची संपूर्ण माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. हा पुरावा देखील तुमच्यासाठी महत्वाचा आहे.land registration documents

जमीन महसूल पावती

दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठी ही पावती देत असतो. या पावत्या सांभाळून ठेवा. जमीन महसूल पावत्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्तावाचा पुरावा ठरू शकतो.land registration number

जमिनीसंबंधिचे पूर्वीचे खटले

जमीनीचा हक्क दाखविण्याचा सातवा पुरवा जमिनीसंबंधिचे पूर्वीचे खटले.. एखादी जमीन तुमची आहे आणि या जमीनीबाबत पूर्वी कोणती केस किंवा खटला चालू असेल, तर याबाबतची कागदपत्रे सांभाळून ठेवा.‌ हा पुरावा तुम्ही जमीनीवर मालकी हक्क दाखविण्यासाठी करू शकता.

Similar Posts