Land map on digital satbara : जमीन नेमकी कोणाची? एका झटक्यात लागणार निकाल, सरळ सातबारा उताऱ्यावरच ‘असा’ येणार जमीन मोजणी नकाशा
सध्याच्या आधुनिक काळात सर्वच डिजिटल झालं आहे. मानव सर्व काही इंटरनेटच्या माध्यमातून सोपं करून पाहत आहे. त्यामुळं कोणतीही माहिती एका क्लिकवर मिळणं एकदम सोपं झालं आहे. पूर्वीच्या काळात ज्यासाठी नागरिकांना प्रचंड खस्ता खाव्या लागत होत्या. ज्या आता फक्त एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. अगदी महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह शेतीशी ही कागदपत्रे म्हणजेच (Land Map Satbara) सर्व काही ऑनलाईन स्वरूपात मिळण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागू नये यासाठी शेतकऱ्यांना आता डिजिटल सातबारा (Land Map Satbara) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
डिजिटल ७/१२ (Digital sign satbara)
जमिनीचा सर्वात महत्त्वपूर्ण पुरावा म्हणजे सातबारा देखील ऑनलाइन स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. या सातबारावर डिजिटल स्वाक्षरी (digital sign satbara)असते. या डिजिटल स्वाक्षरीमुळेच सातबारा खोटा आहे की खरा हे समजते. आता शासनाने डिजिटल सातबाराच्या यशानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
डिजिटल नकाशे Digital land record
जमिनीचे मोजमाप करताना जमिनीचे नकाशे (bhunaksha) फार महत्त्वाची कामगिरी करतात. ऑफलाइन पद्धतीने जमिनीचे नकाशे काढण्यात बराच वेळ खर्ची जायचा, शिवाय त्यात फसवणूक होण्याची शक्यता देखील असते. डिजिटल सातबारा नंतर शासन आता डिजिटल सातबाऱ्यावर डिजिटल नकाशे ( land survey map online )उपलब्ध करण्याच्या पूर्ण तयारीत असून या बाबतच्या हालचाली ही सुरू झाले आहेत.
जमिनीचा निकाल लागणार एका झटक्यात
सातबारावर जमिनीचे नकाशे (bhunaksha) उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळणं शक्य होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालकीची नेमकी जमीन किती व कोणती? हे एका क्लिकवर ऑनलाइन माध्यमातून कळणार आहे. त्यामुळे जमिनीबाबत असणारे वादही मिळणार आहेत. कदाचित सातबाऱ्यावर एक क्यूआर कोड देण्यात येईल याद्वारे शेतकरी आपल्या जमिनीचे नकाशे पाहू शकतात. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे.