औरंगाबादमध्ये रेल्वेरुळात पाय अडकल्यामुळे रुळावर पडलेली महिला मोटरमनच्या सतर्कतेमुळे बचावली..
औरंगाबादमध्ये लोको-पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. रेल्वे रुळात पाय अडकून पडलेली महिला सतर्कतेमुळे थोडक्यात बचावली. महिला रुळ ओलांडत असतानाच पाय अडकला आणि तेवढ्यातच रेल्वेही आली. यानंतर घाबरलेल्या महिलेने रुळावरच पडून राहिली, पण सतर्क असलेल्या लोको-पायलटने ट्रेन थांबवली. अख्खी ट्रेन अंगावर या महिलेला सुखरुप बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आलं.
सविस्तर माहिती अशी की, औरंगाबाद शहरामधील चिखलठणा रेल्वे रूळ परिसरामध्ये एक महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेच्या प्रेशर हॉर्न मुळे घाबरलेल्या महिलेचा पाय रुळात अडकला. त्यामुळे महिलेला पुढे जाता येईना आणि ती रुळावर पडली. याच दरम्यान त्याच रुळावर एक रेल्वेगाडी येत होती. या रेल्वेगाडीचे मोटरमन अमितसिंग आणि धीरज थोरात यांनी महिला रेल्वे रुळावर पडल्याचे पाहिले.
मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे प्रतितास 100 किमीचा वेग असलेली रेल्वे अवघ्या 20 सेकंदात थांबवून या महिलेला सुखरुप रेल्वे रुळावर बाहेर काढले. अमितसिंग आणि धीरज थोरात अशी मोटरमनची नावे आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोटरमनने प्रसंगावधान दाखवल्याने महिला मरणाच्या दारातून वाचली.जनशताब्दी एक्सप्रेस चे मुख्य चालक अमितसिंग सहचालक धीरज थोरात याची सतर्कता रेल्वे प्रशासनाने घेतली नोंद लवकरच सत्कार केला जाणार आहे