Modi Awas Gharkul Yojana 2024 : गरीबांना free मध्ये मिळणार हक्काचे घर! ही आहे मोदी आवास घरकुल योजना..

Modi Awas Gharkul Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे अर्थसंकल्प-2023 मध्ये गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गरिबांसाठी Gharkul Yojanaची घोषणा केली आहे.

Modi Awas Gharkul Yojana
Modi Awas Gharkul Yojana

त्यामुळे राज्यातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचे घर मिळणार आहे. परंतु शासनाने यासाठी काही निकष ठरवले असून त्या निकषानुसार केवळ पात्र असलेल्या लाभार्थ्यांना या योजेनेचा लाभ देण्यात येणार आहे.

जर तुम्हाला देखील घरकुल योजनेचा लाभ घेऊन हक्काचे घर पाहिजे असल्यास दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून Awas Gharkul Yojana साठी अर्ज करा.

पात्रता व निकष

  • अर्जदार इतर मागास वर्गातील आणि कास्ट ओबीसी (OBC) प्रवर्गातील असावा.
  • अर्जदार करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावी, लक्षात ठेवा इतर राज्यातील नागरिक या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • Modi Awas Gharkul Yojanaचा लाभ घेण्यास इच्छुक असलेली व्यक्तीने महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव केलेले असावे.
  • सदरील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजारापेक्षा कमी असेल तरच Modi Awas Gharkul Yojana द्वारे घरकुल मिळेल.
  • अर्जदार व्यक्तीने यापूर्वी घरकुल संबंधीत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, शिवाय त्याने गृहकर्ज पण घेतलेले नसावे.
  • अर्जदार व्यक्तीकडे या योजनेंतर्गत घर बांधण्याकरिता स्वतःची जमीन असावी, आणि त्या जमिनीवर त्याचे स्वतःचे घर कच्या स्वरूपात असावे.

Modi Awas Gharkul Yojanaसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • जमिनीचा ७/१२ उतारा
  • जमिनीची खरेदी खत (रजिस्ट्री)
  • ग्रामपंचायतने जारी केलेले जमीन मालकीचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • जातीचा दाखला
  • मतदान कार्ड
  • विजेचे बिल
  • मनरेगा जॉब कार्ड
  • बँकेचे पासबुक

(सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत)

Modi Awas Gharkul Yojana साठी अर्ज कसा करायचा?

सर्वप्रथम Modi Awas Gharkul Yojana ग्रामीणसाठी इच्छुक व्यक्तिने अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव हे Waiting List मध्ये येईल, नंतर ग्रामपंचायतद्वारे गावातील मागासवर्गीय अर्जदारांचे नाव निवडले जातील आणि त्यानुसार अर्जदारांना या योजनेचा फायदा मिळेल.

लक्षात ठेवा याची संपूर्ण प्रक्रिया ग्रामपंचायत द्वारे होणार असल्याने तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतीत संपर्क साधू शकता.

Modi Awas Gharkul Yojana द्वारे जे व्यक्ती अर्ज करतील त्यापैकी निवडलेल्या व्यक्तींना घर बांधण्यासाठी 1.20 लाख मिळणार आहेत. म्हणजे घर बांधण्यासाठी 1.20 लाखापर्यंतचा खर्च राज्य सरकार देणार असून बाकीचा खर्च हा अर्जदार व्यक्तीला करावयचा आहे. याशिवाय एक महत्वाची बाब म्हणजे, घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी व्यक्तींना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू सुद्धा दिली जात आहे, त्यासाठी राज्य सरकारने मोफत वाळू योजनेची सुरूवात केली आहे.

अधिक माहितीसाठी खालील विडियो अवश्य बघा

Similar Posts