पुन्हा दोन हत्येने हादरलं औरंगाबाद; पती-पत्नीचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला, नातेवाईकानेच केली हत्या?

औरंगाबाद शहरात आज सकाळी एक पुंडलिक नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पती आणि पत्नीची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या नेमकी केव्हा झाली याचे गूढ असून, दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये मिळून आले आहे. पती शामसुंदर हिरालाल कलंत्री वय -55 वर्षे आणि पत्नी किरण शामसुंदर कलंत्री -45 वर्षे, अशी मृताची नावे आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार दोघांची हत्या त्यांच्याच नातेवाईकांनी केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. ही हत्या अत्यंत योजनापूर्वक केल्याचंही दिसून येत आहे. हत्येनंतर दोघांचे मृत-देह वेगवेगळ्या मजल्यावरील पलंगाखाली ठेवल्यामुळे काही काळ फारसं कुणाला कळलं नाही. मात्र मृतदेह कुजल्यावर वास येऊ लागल्यामुळे या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.

घटनास्थळी पोलिसांचा लवाजमा; दुर्गंध सहन न झाल्याने तोंडावर मास्क आणि रुमाल बांधण्यात आले..

सविस्तर माहिती अशी की, आज दिनांक 23 मे 2022 सोमवार रोजी सकाळी कलंत्री यांच्या घराला कुलूप असून त्यांच्या घरातून कुजल्यासारखा वास येत असल्याची माहिती सविता सातपुते यांनी पोलिसांना कळवली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनस्थळी दाखल होऊन कुलूप तोडून आत प्रवेश केला असता पती-पत्नीचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान त्यांचा मुलगा आकाश कलंत्री या घटनेपासून फरार असून त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत आहे. मात्र, शहरात लागोपाठ होणाऱ्या हत्यांचे सत्र चिंताजनक ठरत आहे.

Similar Posts