हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करत होता अजगर, तेवढ्यातच तरुण वाचवायला पोहोचला, मग काय घडले ते पाहाच..!
अजगर हा अतिशय क्रूर प्राणी आहे. तो त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांनाही जिवंत गिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक अजगर एका हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
अजगराला हरण जिवंत गिळायचे होते
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरणाच्या अंगावर एक मोठा अजगर गुंडाळला आहे. त्याला हरण जिवंत गिळायचे होते. यादरम्यान एका तरुणाची नजर त्यांच्यावर पडली. यानंतर तो तरुण हरणाचा जीव वाचवण्यासाठी झाडाची एक फांदी घेऊन येतो. झाडाच्या या फांदीने अजगराला मारायला सुरुवात करतो. यानंतर अजगर चिडतो आणि त्या तरुणाकडे झेप घेतो.
व्हिडीओमध्ये असे सुद्धा दिसत आहे की, अजगर तरुणाच्या दिशेने झेप घेत असताना अतिशय रागात होता त्यानंतर अखेर अजगराला हरणाला सोडून पळून जावे लागते.