Pik Vima Claim | पीक नुकसानीचा दावा असा करा आणि मिळवा पीक विमा..

Pik Vima Claim: शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. प्रधानमंत्री पीक विमा योजना.. या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, अतिवृष्टी, नैसर्गिक आग, दुष्काळ, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, किड व रोग अशा कारणांमुळे शेतीपिकांचे होणारे नुकसानीस विमा संरक्षण दिल्या जातो.

यंदा आत्तापर्यंत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. आता शासकीय विमा कंपनीचाच सहभाग असल्याने शेतकऱ्यांची लूट होणार नाही. त्यांना अधिकचा विमा मिळेल अशी अपेक्षा आहे.. या योजनेअंतर्गत तुमचं नुकसान झाले, तर मोठ्या प्रमाणात विमा संरक्षण दिल्या जाईल, असे सांगण्यात आले. (Pik Vima Yojana 2022 Maharashtra)

जर तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा काढला असेल, तर तुम्ही नुकसानीचा दावा करू शकता. हा नुकसानीचा दावा तुम्ही ‘Crop Insurance’ ॲप्लिकेशनद्वारे करू शकता. तुम्ही पीक विमा कंपनीच्या दिलेल्या क्रमांकावर कॉल करून नुकसानीचा दावा करू शकता. तर ‘Crop Insurance’ ॲपद्वारे पीक नुकसानीचा दावा कसा करायचा जाणून घेऊ या.. (Pik Vima Yojana Mahiti)

पीक नुकसानीचा दावा असा करा..

click here abdnews


सर्वप्रथम ‘गुगल प्ले स्टोअर’वर जाऊन ‘Crop Insurance’ ॲप डाऊनलोड करा.
ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर, Change Language वर क्लिक करून जी भाषा हवी ती भाषा निवडा.
आता ‘नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा’ यावर‌ क्लिक करा.
यानंतर, ‘पीक नुकसानीची पूर्व सूचना’ या पर्यायावर क्लिक करा.
आता मोबाईल नंबर टाका व तुम्हाला ओटीपी येईल.
यानंतर, खरीप किंवा रब्बी हंगाम निवडा, वर्षं, योजना, राज्य निवडून खालील हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
आता पीक नुकसानीच्या घटना नोंदविण्यासाठी घटनेचा प्रकार, पीक वाढीचा टप्पा, नुकसानीची टक्केवारी, नुकसानीचा फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा.
सर्व माहिती भरल्यानंतर, ‘सबमिट’बटणावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर ‘Docet ID’ येईल, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
या डॉकेट आयडी द्वारे पीक नुकसानीची स्थिती बघता येईल. (Pik Vima Claim Online)

कॉलद्वारे पीक नुकसानीचा दावा करा..

click here abdnews


तुम्ही कॉल करून पीक नुकसानीचा दावा करू शकता. तुम्ही ज्या जिल्ह्यातं असाल, त्या जिल्ह्यातील पीक विमा हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. (Pik Vima Helpline Number)

भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा – 18001037712
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार – 18001024088
इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली – 18001035490
एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – संभाजीनगर, भंडारा, अकोला, धुळे, पुणे – 18002660700
बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – धाराशिव – 18002095959
भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड – लातूर – 18004195004

हे देखील वाचा-

Similar Posts