Portable Solar Generator | लाईट गेली तरी चिंता करण्याची गरज नाही, हे छोटंसं सोलर इन्व्हर्टर देणार भरघोस वीजपुरवठा

Portable Solar Generator
Portable Solar Generator

Portable Solar Generator : घरात नेहमी-नेहमी लाईट जात असेल, तर घरात असलेली उपकरणे चालवता येत नाही. घरात लॅपटॉप, स्मार्टफोनसह टीव्ही, फॅन, एसी, कुलर, फ्रीज असे अनेक उपकरणे असतात. यामध्ये लॅपटॉप आणि स्मार्टफोनला सतत चार्ज करावे लागते. अनेकवेळा असे होते की, लाईट नसल्याने उपकरणे चालवता येत नाही, तसेच चार्जिंग देखील करता येत नाही.

solar power अनेकांना विजेची सवय लागली आहे‌. विजेमुळे अनेक उपकरणे चालवून कामे सोपी झाली आहे. तसेच अनेकांना टीव्हीमध्ये क्रिकेट मॅच किंवा इतर कोणताही प्रोग्राम पाहायचा असतो आणि अशावेळी लाईट नसल्यास काय करावे समजतं नाही. (Solar Generator Portable)

आता लाईट गेली तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सोलर इन्व्हर्टर घेऊन विना विजेशिवाय उपकरणे चालवू शकता. आज तुम्हाला अशा सोलर इन्व्हर्टर बद्दल माहिती देणार आहोत जे की आकाराने लहान असून शक्तिशाली इन्व्हर्टर आहे. हे सोलर इन्व्हर्टर कोणते आहे व या सोलर इन्व्हर्टरची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

सोलर इन्व्हर्टर


या सोलर इन्व्हर्टरचे SARRVAD पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर S-150 असं आहे. हे सोलर इन्व्हर्टर आकाराने खूपच लहान असून तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे घेऊन जाऊ शकता. या सोलर इन्व्हर्टरचा टीव्ही आणि लॅपटॉप यांसारखी अनेक उपकरणे चालवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

या सोलर इन्व्हर्टरमुळे घरातील प्रत्येक उपकरणाला विज मिळते. याद्वारे तुम्ही उपकरणे चालवण्यासोबत अनेक उपकरणे चार्ज देखील करू शकता. ज्यामध्ये मोबाईल, टॅबलेट, पीसी (PC), चार्जिंग बॅटरी चार्ज करू शकता. तसेच लाईट, टीव्ही, फॅन, फ्रीज, कुलर, ए.सी. (AC), गिझर असे अनेक उपकरणे चालवू शकता. (Portable Solar Generator)

SARRVAD सोलर इन्व्हर्टरबाबत..


SARRVAD पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर S-150 हे अतिशय शक्तिशाली आणि जबरदस्त सोलर इन्व्हर्टर आहे. ज्याची क्षमता 4200 mAh 155Wh एवढी आहे. या इन्व्हर्टरचे वजन 1.89 किलोग्रॅम आहे. तुम्ही सौर पॅनलने सूर्यप्रकाशात या इन्व्हर्टरची चार्जिंग करू शकता. (SAARVAD Portable Solar Power Generator)

SARRVAD पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर S-150 ची किंमत 19,000 रुपयांच्या किंमतीमध्ये खरेदी करू शकता. हे सोलर इन्व्हर्टर आकाराने लहान असल्याने तुम्ही ते बॅगमध्ये ठेवून कोठेही घेऊन जाऊ शकता. या सोलर इन्व्हर्टरमुळे लाईट गेली तरी चिंता करण्याची गरज नाही. तसेच या सोलर इन्व्हर्टरची माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!