Ration Card Diwali Gift | रेशन कार्डधारकांना 100 रुपयांत मिळणार या वस्तू

Ration Card Diwali Gift

Ration Card Diwali Gift: दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना मिळणार गिफ्ट.. शिंदे-फडणवीस सरकार म्हणजेच राज्य सरकार दिवाळीला भेट देणार आहे. या दिवाळीनिमित्त रेशनकार्ड धारकांना ‘दिवाळी गिफ्ट’ (Diwali Gift) दिल्या जाणार आहे. या ‘दिवाळी गिफ्ट’बाबत जाणून घेऊ या..

राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट दिले आहे. या दिवाळीत गोरगरीबांना फक्त 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर आणि तेल दिले जाणार आहे. सामान्यजनांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Ration Diwali Gift महाराष्ट्रातील 7 कोटी रेशन कार्डधारकांना 100 रुपयांत प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर व तेल मिळणार. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. (Ration Card)

रेशनकार्ड धारकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.. Ration Card Diwali Gift


दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील रेशन कार्डधारकांना राशन वस्तूंचे दिवाळी पॅकेज फक्त 100 रुपयांत देण्याचा निर्णय 4 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. (Ration Card in Marathi)

या दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 किलोच्या परिमाणात रवा चणाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच तब्बल 7 कोटी नागरिकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. (Ration Card Maharashtra)

Ration Card New Update हे दिवाळी गिफ्ट म्हणजेच हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली. (Ration Card Diwali Bonus)

100 रुपयांत हे मिळणार..
साखर – 1 किलो
रवा – 1 किलो
चणा डाळ – 1 किलो
तेल – 1 लिटर

साखर, रवा, चणा डाळ, तेल दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. रेशन कार्डधारकांना हे दिवाळी गिफ्ट मिळत असल्याने, नक्कीच आनंद होईल. Ration Card Diwali Gift


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!