Solar gas Stove : आता गॅससाठी पैसे मोजणे बंद! फक्त 12 हजारात घरी आणा हा सोलर स्टोव्ह आणि Free मध्ये करा स्वयंपाक!
Solar gas Stove: दररोज वाढत जाणाऱ्या महागाईमुळे अनेकांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. मात्र, तुम्ही या एका पद्धतीचा अवलंब करून, तुमच्या खर्चामध्ये मोठी कपात करू शकणार आहात. हे करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या घरात घरगुती गॅसऐवजी सौर स्टोव्ह आणावा लागणार आहे सरकारी मालकीची तेल कंपनी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे Solar gas Stove विकसित करण्यात आला आहे. हा सोलर स्टोव्ह तुमच्या घरी आणून तुम्ही स्वयंपाक गॅससाठी होणाऱ्या खर्चाची बचत करु शकता.
Solar gas Stove
इंडियन ऑइलने या (Solar gas Stove) सौर स्टोव्हला सूर्य नूतन (surya nutan) असे नाव दिले आहे. हा सोलर स्टोव्ह विकत घेण्यासाठी तुम्हाला फक्त एकदाच पैसे खर्च करावे लागणार आहेत, मात्र दर महिन्याला यानाऱ्या महागड्या स्वयंपाकाच्या गॅस खर्चापासून तुम्ही सुटका होणार आहे. यामुळे दर महिन्याला तुमची बचत सुद्धा होणार आहे
तुम्ही सन न्यू सोलर स्टोव्ह बाजारातून खरेदी करू शकता. याचे बेस मॉडेल विकत घेण्यासाठी तुम्हाला 12,000 रुपये खर्च करावे लागणार आहे. आणि जर तुम्हाला याचे टॉप मॉडेल घ्यायचे असेल तर तुम्हाला 23,000 रुपये द्यावे लागतील. मात्र, येत्या काही दिवसांत किमतीत लक्षणीय घट होण्याची अपेक्षा इंडियन ऑईलला आहे.
तुमच्या घरी Solar gas Stove आणून तुम्ही स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा महागडा खर्च टाळू शकता. सरकारी मालकीची तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सौरऊर्जेवर चालणारा अप्रतिम सौर स्टोव्ह विकसित केला आहे. सूर्य नूतन असे या सौर स्टोव्हच नाव आहे. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात हा सोलर या सौर स्टोव्ह सहज वापरू शकता.
सूर्य नूतन सोलर स्टोव्ह कायमच सूर्यप्रकाशात ठेवण्याची काही एक गरज नाही. आपण ते स्वयंपाकघरात किंवा अन्य कुठेही ठेवू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार किंवा गरजेनुसार वापरू शकता. याबरोबरच तुम्ही हा स्टोव्ह एकाच ठिकाणी कायमस्वरूपी फिक्स सुद्धा करून ठेऊ शकता. तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात ज्याप्रमाणे गॅस स्टोव्ह लावता त्याचप्रमाणे तुम्ही हा स्टोव्ह सुद्धा इन्स्टॉल करू शकता. ही कुकिंग सिस्टीम, रिचार्ज करण्यायोग्य इनडोअर सोलर कुकिंग सिस्टम आहे.
सूर्य नूतन सोलर स्टोव्हची Solar gas Stove रचना ही इंडियन ऑइलच्या फरीदाबाद स्थित R&D केंद्राद्वारे करण्यात आली असून त्याचे पेटंटही इंडियन ऑइलने घेतले आहे. सूर्य नूतनचे इन्सुलेशन डिझाइन, रेडिएशन आणि सौर उष्णतेचे नुकसान कमी करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. एवढेच नाही तर, तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये सूर्य नूतन सोलर स्टोव्ह उपलब्ध करण्यात आले आहे.
चार जणांच्या कुटुंबासाठी, सूर्य नूतन सोलर स्टोव्हच्या एका प्रीमियम मॉडेलवर, तुम्ही अगदी सहज अन्न शिजवू शकणार आहात. या स्टोव्हचा वापर करण्यासाठी, तुम्हाला याचे एक उपकरण स्वयंपाकघरात बसवावे लागेल आणि दुसरे सूर्यप्रकाशात ठेवावे लागणार आहे. सूर्यप्रकाशात यासाठी कारण हा स्टोव्ह त्याद्वारे चार्ज होणार आहे. याशिवाय चार्जिंगनंतरही याचा वापर करता येतो.
सूर्या नूतन सोलर स्टोव्ह हे हायब्रिड मोडमध्ये सुद्धा काम करते. म्हणजेच काय तर या स्टोव्हसाठी तुम्ही सौरऊर्जेशिवाय इतर ऊर्जास्रोत सुद्धा वापरू शकणार आहात. 12,000 रुपयांपासून या सोलर स्टोव्हची किंमत सुरू होते. या सोलर स्टोव्हच्या बेस मॉडेलची किंमत ही साधारणतः 12,000 रुपये असणार आहे, तसेच याच्या टॉप मॉडेलची किंमत ही 23,000 रुपयांपर्यंत असेल.
इंडियन ऑइलच्या म्हणण्यानुसार, येत्या भविष्यात सोलर स्टोव्हच्या किमतींमध्ये घट झालेली दिसून येऊ शकते.. इंडियन ऑईल या कंपनीने नुकताच बाजारात आपला सोलर स्टोव्ह लाँच केला आहे. या सोलर स्टोव्हला घरी आणून तुम्ही स्वयंपाक गॅस साठी होणाऱ्या महागड्या खर्चापासून स्वतःला वाचवू शकता.