बायकोला व्यवस्थित साडी नेसता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, मला ती पसंत नाही;’आय क्वीट’ स्टेट्स ठेवून तरुणाची आत्महत्या..

मनासारखी बायको न मिळाल्यामुळे उदास नवविवाहित तरुणाने WhatsApp वर ‘I Quit’ असे स्टेट्स ठेवून आत्महत्या केल्याची घटना मुकुंदवाडी परिसरातील राजनगर मध्ये रविवारी रात्री घडली असून अजय समाधान साबळे वय २५ वर्षे असे मृताचे नाव आहे अजयचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जेवण केल्यावर त्याने घरातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन “पत्नी माझ्यापेक्षा वयाने ५ वर्षे मोठी आहे. तिला नीट स्वयंपाक येत नाही. चांगली साडी घालता येत नाही. हॉटेलात जेवायला गेल्यावर ती प्लेट उचलून ठेवते, अशी सुसाइड नोट लिहून गळफास घेतला. काही वेळात त्याचा मित्र त्याचे WhatsApp वरील ‘आय क्विट’ असे स्टेट्स बघून त्याला भेटण्यासाठी आला असता त्याला अजयने गळफास घेतलेला दिसला.

सदर घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी अजयला बेशुद्धावस्थेत घाटीमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अजय लग्न झाल्यापासून राहत होता नाराज

मिळालेल्या माहितीनुसार अजय लग्नानंतर नेहमी नाराज राहत होता. तेव्हापासून तो सतत समाज-माध्यमावरील त्याच्या अकाउंटला निराशाजनक स्टेट्स ठेवत होता. त्याच्या मित्रांनी त्याला अनेकदा विचारले; मात्र तो काही सांगत नव्हता.

सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी सांगितले की, अजयच्या रूममध्ये एक पाणी सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये त्याने “मला मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही, एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवायला नेले तर तेथेही ती जेवणानंतर स्वत:च्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते” असे लिहिले असून या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्याचेच आहे का, हे तपासणीकरिता पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!