TATA देत आहे त्यांच्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर होईल खरेदी करण्याची इच्छा!
मागील काही वर्षांपासून टाटा मोटर्सच्या विक्रीमध्ये मोठी वाढ होत आहे. विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी टाटा कंपनीने या एप्रिल मध्ये जबरदस्त ऑफर दिल्या आहेत.
कंपनीने Tiago, Tigor, Harrier आणि Safari वर विविध ऑफर जाहीर केल्या आहेत. यामध्ये नगद सवलत / ग्राहकांना ऑफर, कॉर्पोरेट सूट व एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. कंपनीने गाड्यांवर एकूण 45,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले आहेत.
टाटा टियागो (Tata Tiago)
टाटा कंपनीने त्यांच्या लोकप्रिय हॅचबॅक टियागोवर 23 हजार रुपयांपर्यंतचा लाभ देत आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 5.22 लाख रुपये असून कारच्या XE, XM आणि XT व्हेरिएंटवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस जारी केला आहे, तर कॉर्पोरेट सूट साठी 3,000 रुपयांचा फायदा होणार आहे. एक्सचेंज आणि यापेक्षा महाग व्हेरिएंट्सवर कंपनीने 10,000 रुपयांची ग्राहक सूट दिली आहे. तसेच 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे.
टाटा टिगोर : (Tata Tigor)
टाटा टिगोर कंपनीची एक लोकप्रिय सेडान कार आहे, ज्यावर कंपनीतर्फे 23 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.82 लाख रुपये आहे. टिगोरचे XE आणि XM व्हेरिएंटवर 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सूट मिळत आहे. कारच्या एक्सचेंज आणि याहून अधिक महाग व्हेरिएंटवर 10,000 रुपयांपर्यंत ग्राहक सूट देण्यात येत आहे. तसेच, 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस जारी केले आहे.
टाटा हॅरियर : (Tata Harrier)
टाटा मोटर्सच्या शक्तिशाली एसयूव्ही हॅरियरला 45 हजार रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात येत आहे, टाटा हॅरियरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 14.53 लाख रुपये आहे. हॅरियरच्या XE आणि XM व्हेरिएंटवर 40 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे.
टाटा सफारी : (Tata safari )
काही वर्षांपूर्वी सफारी नेमप्लेट भारतात परत लॉन्च झाली आहे आणि आता कंपनी या एसयूव्हीवर एकूण 40 हजार रुपयांपर्यंतचा फायदा देत आहे. या टाटा सफरीची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 15.02 लाख रुपये आहे. कंपनीने सफारीच्या XE आणि XM व्हेरिएंटवर 40 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला आहे.