डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार.

भारत देशाच्या संविधानाला ज्यांनी जन्म दिला ज्यांच्या नावाने आज संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो, गोरगरिबांच्या हक्कांना ज्यांनी मिळवून दिले, आणि प्रत्येकाला स्वतःच्या हक्काची जाणीव करून दिली असे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर.

ज्यांनी स्वतःचे जीवन समाजासाठी समर्पित केले. आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांच्या दरीतून बाहेर काढले. आज बाबासाहेबांना आधुनिक भारताच्या त्या महान व्यक्तींमध्ये प्रत्येक जण ओळखतो.

वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार.

▪️तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.

▪️मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो.

▪️आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग.

▪️बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे.

▪️स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुती वर विश्वास ठेवा.

▪️स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.

▪️शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

▪️कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते.

▪️माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे.

▪️शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

▪️रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊच नये अशी व्यवस्था करावी.

▪️जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो, तो नेहमी चांगले कार्य करतो.

▪️जीवन लांब नाही तर महान असायला हवे.

▪️पती पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असणे आवश्यक आहे.

▪️ एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य.

▪️जर मला असं समजेल की संविधानाचा दुरुउपयोग होतोय तर सर्वात आधी त्याला मी जाळेल.

▪️शक्तीचा उपयोग वेळ आणि काळ पाहूनच करावा.

▪️ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.

▪️संविधान कितीही चांगले असले तरी राबवणारे लोक वाईट असतील तर ते वाईट ठरेल आणि संविधान कितीही वाईट असेल तरी ते राबवणारे लोक चांगले असतील तर ते चांगले ठरेल.

▪️एखादा समाज किती पुढारलेला आहे त्या समाजात महिला किती शिकलेल्या आहेत यावरून ठरतं.

▪️अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

▪️अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.

▪️अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.

▪️आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका.

▪️जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

▪️जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

Similar Posts