Traffic E Challan Check Online: तुमच्या गाडीवर असलेला फाईन आजच चेक करा; फक्त 2 मिनिटांत..

E Challan Payment Online : आपण जेव्हा वाहन चालवत असतो, तेव्हा रहदारीचे सर्व आपल्याला पाळणे बंधनकारक असते. आणि आपण ट्रॅफिक रुल्स मोडले तर आपल्याला शासनातर्फे ट्रॅफिक चालान म्हणजेच दंड देण्यात येते. पूर्वी ट्रॅफिक हवालदार आपल्याला ऑन द स्पॉट पावत्या कापून चालान देत असे, मात्र आता तसे नाही आता आपण वाहतुकीचे नियमांचे पालन करतो की नाही हे तपासण्यासाठी चौका-चौकामध्ये , ट्रॅफिक सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे, या कॅमेऱ्यात तुम्ही ट्रॅफिकचे नियम तोडल्याचे आढळल्यास तुम्हाला लगेच ई-चालान पाठवले जाते. एकंदरीत तर काय त्या कॅमेऱ्यात तुमच्या गाडीचा नंबरची नोंद होते आणि तुम्हाला दंड लावला जातो. Check e Challan Onlin

Traffic Challan Check Online
Traffic Challan Check Online

त्यामुळे हे लक्षात असू द्या की, यापुढे तुम्ही तुमच्या नकळत जरी वाहतुकीचे नियम मोडले आणि तुम्हाला वाहतूक पोलिसांनी अडवले नाही तर जास्त आनंदी होऊ नका कारण तुम्ही तोडलेला नियम तुम्हाला दंड भरायला भाग पाडू शकतो. कारण तुमच्या सर्व चुका त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात क्लिक झालेल्या असतात.  आणि काही मिनिटांतच तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन ई-चालानचा मॅसेज येतो, त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक चालान म्हणजेच E-challan असे म्हणती.  Traffic Challan Check:

असे ऑनलाईन चेक करा तुमचे E Challan

आपल्या देशात जवळपास सर्वच राज्यांत ऑनलाईन प्रकारे ऑनलाईन E Challan चेक करण्याची सेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात सुद्धा वेबसाईट आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातून E Challan चेक करता येते. ऑनलाईन E Challan Check करण्याचे दोन पर्याय आहेत. 

1. E-Challan Check करा महाट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुन
2. E-Challan Check करा मोबाईल ऍपच्या माध्यमातून

शासनाच्या महाट्रॅफिक चालान या वेबसाईटवरुन ई चालान चेक करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे–

  • सर्वप्रथम https://mahatrafficechallan.gov.in/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही महा ट्रॅफिक चालानच्या अधिकृत वेबसाईटला ओपन करा
  • आता तुमच्या Vehicle No म्हणजेच वाहन क्रमांक नमूद करा
  • त्यानंतर खालील रकान्यामध्ये वाहनाचे chassis/Engine No चे शेवटचे 4 digits टाकून सबमीट या पर्यायावर क्लिक करा,
  • आता तुम्हाला तुमच्या वाहनाचा चालान इतिहास समोर दिसेल, प्रत्येक चालानवर क्लिक केल्यावर तुम्हाला कोणते चालान कोणता नियम मिळाल्यावर लावण्यात आले आहे हे सुद्धा फोटोच्या स्वरुपात दिसेल, Traffic Challan Check

मोबाईल ॲपच्या माध्यमातून E Challan Check करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून Maha Trafficapp डाऊनलोड करावे लागेल.
  • ॲप डाऊनलोड करून उघडल्यावर तिथे तुमचा मोबाईल नंबर सबमिट केल्यावर तुमच्या मोबाईलवर OTP येईल तो तेथे नमूद करा.
  • आता त्या ॲपमध्ये तुम्हाला 5 पर्याय दिसतील
    • My Vehicles,
    • My E – Challans,
    • Civilian Report,
    • Pay E – Challan,
    • Grievance, Information
  • यातील My E – Challans या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरला सलग्न केलेला वाहन क्रमांक दिसेल, त्यावर कोणतेही चालान असेल तर ते सुद्धा दिसेल.
  • तुमच्या वाहनावर असलेले चालान भरायचे असल्यास तुम्हाला Pay E – Challan या पर्यायावर क्लिक करुन ई चालान ऑनलाईन पद्धतीने भरता येतो, नसता तुम्हाला कोर्टात जाऊन दंड भरावा लागू शकतो

अनेकदा वाहन चालकाला माहित सुद्धा नसते की त्यांच्या नावाने वाहतुक विभागाद्वारे ई चालान जारी करण्यात आले आहे, आणि त्यासाठीच ऑनलाईन पद्धतीने ई चालान तपासता यावे म्हणून शासनाने ही सेवा आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे. 

लक्षात ठेवा, तुमच्या वाहनावरील चालान तुम्ही दिलेल्या मुदतीत भरले नाही तर तुम्हाला न्यायालयात जाऊन दंड भरावा लागू शकतो. त्यासाठीच तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्यांपासून वाचायचे असेल तर तुम्ही वेळेच्या आत चालान भरायला हवे. Check e Challan Online

E – Challan केव्हा भरावे अनिवार्य आहे

कधी कधी वाहन चालकांना माहितीच नसते की कोणते E Challan कोणते नियम मोडल्यावर लावण्यात आलेले आहे, त्यासाठी ई चालान मध्ये असलेल्या फोटोमध्ये आपण केलेली चुक दिसत असते. Check e Challan Online

E Challan केव्हा येतो

  • सिग्नल तोडल्यानंतर
  • दुचाकी वाहनावर हॅल्मेट वापरले नसल्यास
  • दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास करत असल्यास
  • वन वे असताना उलट दिशेने वाहन चालवल्यास
  • चार चाकी वाहनात वाहन चालकाने आणि वाहन चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेल्या व्यक्तीने सिटबेल्ट न लावल्यास

Similar Posts