Voter id card 2023 : मतदान कार्ड हरवलंय, किंवा दुरुस्त करायचंय/नवीन बनवायचंय; आता घरबसल्या मोबाईलवर होईल हे सर्व काम..
Voter id card : मतदार ओळखपत्र हे भारत सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असे कागदपत्रं आहे. मतदार कार्ड (Voter id card) भारतीय निवडणूक आयोगातर्फे जारी करण्यात आलेलं असून ते निवडणूक कार्ड म्हणूनही वापरले/ओळखले जाते. याशिवाय ओळखपत्र, पत्ता आणि वयाचा पुरावा म्हणून सुद्धा काम करते.
आपल्या भारत देशात नेहमी कुठल्या न कुठल्या निवडणुकांची रणधुमाळी सुरूच असते. अशातच आगामी काळात तुमच्या भागात असलेल्या निवडणूकीमध्ये मतदान करण्याकरिता तुमच्याकडे मतदार ओळखपत्र (Voter id card) असणे अत्यंत आवश्यक आहे.
पण नागरिकांना या डिजिटल युगातसुद्धा मतदार ओळखपत्र (Voter id card) बनवणे वेळखाऊ आणि अत्यंत किचकट अशी बाब वाटते. मात्र, तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. याचे कारण म्हणजे, मतदान कार्डसाठी नवीन नोंदणी, नागरिकांचे स्थलांतर, कार्डमध्ये दुरुस्ती, कर्डमधील फोटोत बदल करणे, कर्दला मोबाईल-ईमेल लिंक करने, किंवा कार्ड हरवल्यास/खराब झाल्यास नवीन कार्डसाठी अर्ज करून कार्ड PDF फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करणे सर्व सुविधा आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
( make your new voter id card or edit and download polling cards Learn online process )
या शिवाय अत्यंत महत्वाची बाब म्हणजे या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत असल्यामुळे तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन प्रकारे मतदार ओळखपत्राची सर्व कामे करता येईल. शिवाय, मोबाईल नंबर लिंक असल्यास कलर मतदान कार्ड सुद्धा डाऊनलोड करता येतं.
Voter id card बनवण्याची/चुक दुरुस्त करण्याची प्रक्रिया
मतदार ओळखपत्र Viter id card हे भारतीय निवडणूक आयोगाने भारतीय नागरिकांना दिलेले एक फोटो ओळखपत्र असून त्याला इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) असे देखील म्हणतात, या बरोबरच अत्यावश्यक ओळखपत्र म्हणून सुद्धा हे कार्ड काम करते. मात्र, बऱ्याच वेळा मतदार कार्डवर मतदाराचे नाव चुकीचे छापले जाते, आणि त्यामुळे नंतर त्रास सहन करावा लागतो. तुमच्या कार्डावर सुद्धा चुकीचे नाव असल्यास, तुम्हाला वरील वेबसाईटवर सहजरित्या सुधारता येते.
मतदार ओळखपत्र संबंधित कोणत्याही कामाकरिता https://voters.eci.gov.in/login या लिंकवर क्लिक करा –
लॉगिन करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे-
- सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल किंवा NSVP च्या अधिकृत वेबसाइट https://voters.eci.gov.in ला भेट द्या.
- यानंतर तेथील Voter portel वर क्लिक करा.
- आता तुम्हाला https://voterportal.eci.gov.in/ या पेजवर पाठवले जाईल, किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डायरेक्ट मतदार पोर्टलवर सुद्धा जाऊ शकता.
- यानंतर या पोर्टलवर तुमचे नाव आणि पासवर्ड टाकून नोंदणी करा किंवा आधीच सदस्य असाल तर लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
- नंतर Correction in Voter Id हा पर्याय निवडावा. त्यानंतर तुम्हाला हवी असलेली चुकीची दुरुस्ती करा.