Voter ID Card Mobile Number Link 2024 : मतदार ओळखपत्राशी मोबाईल नंबर लिंक करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या

Voter ID Card Mobile Number Link 2024 : मतदार ओळखपत्र हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मतदान करण्यासाठी आणि तुमची ओळख पडताळून करण्यासाठी मतदार ओळखपत्राचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक करता तेव्हा तुमच्यासाठी व्होटिंग कार्डशी संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करणे खूप सोपे होते. त्यात समजा तुमचे मतदार ओळखपत्र हरवले आहे आणि तुम्हाला ते ऑनलाइन डाउनलोड करायचे आहे (Voter ID Card Online Download), तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मतदार ओळखपत्राशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे (Voter id Mobile Number linking). त्यासह मतदार ओळखपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही तुमचा इलेक्टोरल फोटो ओळखपत्र क्रमांक (EPIC) लक्षात असणे आवश्यक आहे.

Voter ID Card Mobile Number Link
Voter ID Card Mobile Number Link

Voter ID Card Mobile Number Link 2024

तुम्ही तुमचा मोबाईल नंबर मतदार कार्डशी लिंक केलेला आहे का?

अनेक लोकांच्या बाबतीत असे घडते की, त्यांचे मतदार ओळखपत्र कुठे ना कुठे गहाळ होते आणि त्यांना कोणता मोबाईल क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडलेला Voter ID Mobile Number Link आहे हे आठवत नाही. त्याचबरोबर अनेक लोकांचे मोबाईल क्रमांक त्यांच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केले गेलेले नाहीत. अशा वेळी मतदान ओळखपत्र मोबाईल नंबरशी लिंक Voter ID Card Mobile Number Linked केलेले नसेल, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

मोबाईल नंबर मतदार कार्डशी कसा लिंक करायचा? (Voter Card Download)

तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मतदान ओखपत्राशी कसा लिंक करायचा हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत; जेणेकरून तुम्ही हे काम मोबाईलच्या माध्यमातून घरीबसल्या करू शकता. शिवाय मतदान कार्ड मोबाईल नंबरला लिंक करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. मतदार कार्ड आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याची किंवा दुरुस्त करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. जाणून घ्या लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया.

मतदार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करण्याच्या काही सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे :

  • सर्वप्रथम ऑफिशियल नॅशनल वोटर्स सर्व्हिस वेबसाईटवर https://www.nvsp.in वर जा.
  • आता या वेबसाईटवर मोबाईल नंबर, ईमेल, पासवर्ड व कॅप्चा कोड भरून लॉग इन करा.
  • तुम्ही नवीन युजर असाल, तर साइन अप करा. त्यासाठी मोबाईल नंबर, ईमेल व कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुढे जा.
  • तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर ‘वन टाइम पासवर्ड’ प्राप्त करण्यासाठी ‘रिक्वेस्ट ओटीपी’वर क्लिक करा.
  • मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाका. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
  • तुमच्या मतदान ओळखपत्रात तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्हाला होमपेजवर फॉर्म 8 वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर ‘सेल्फ’ सिलेक्ट करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. मग Other ऑप्शनवर सिलेक्ट करून Epic भरा आणि सबमिट करा.
  • ८) पुढील स्क्रीनवर तुम्हाला मतदाराचे तपशील दिसतील. त्यानंतर ‘ओके’वर क्लिक करा.
  • ९) मग दुसऱ्या क्रमांकावर दिलेला करेक्शन पर्याय निवडा.
  • १०) आता तुमच्या समोर फॉर्म 8 ओपन होईल, तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा ईमेल टाका आणि Next वर क्लिक करा.
  • ११) यानंतर प्लेस भराआणि कॅप्चा कोडदेखील टाका. मग ‘सेंड ओटीपी’ बटणावर क्लिक करा.
  • १२) त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP भरा आणि फॉर्म डिटेल्स एकदा नीट वाचून घ्या. मग ‘सबमिट’वर क्लिक करा.
  • १३) आता ४८ तासांनंतर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केला जाईल.

Similar Posts