“औरंगाबादकरांसाठि पाणी पुरवठा गॅप बाबत महत्वाची सूचना”

औरंगाबाद शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेमध्ये पाणी वाढविण्यासाठी जटवाडा हर्सुल तलाव येथुन हर्सल जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत ३५० मीमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

या अंतर्गत सदरील जलवाहिनीवर शनिवार दिनांक ०४.०६.२०२२ रोजी क्रॉस कनेक्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे हर्सुल जलशुध्दीकरण केंद्र येथे येणारे पाणी बंद राहणार आहे. परिणामी दिल्लीगेट जलकुंभ येथे पाणी पुरवठा होणार नसल्याने दिल्लीगेट जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा एक दिवस विस्कळीत होणार आहे.

पाणी पुरवठा संदर्भाने नागरीकांच्या होणा-या गैरसोयी बाबत औरंगाबाद महानगरपालिका दिलगिरी व्यक्त करीत आहे. तरी नागरीकांनी सहकार्य करावे ही विनंती.

Similar Posts