पावसाळ्यात फिरण्यासाठी ‘हे’ आहेत परफेक्ट विकेंड डेस्टिनेशन, एकदा नक्की भेट देऊन पाहा..

Best Monsoon Place in Maharashtra : पावसाळा नुकताच सुरू झाला असल्याने काही जणांनी फिरण्याचे नियोजन सुरू केलेले असेल. यावेळेस पावसाळ्यात कोणते ठिकाण पाहायचे याचा काहीसा संभ्रम असेल, तर तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील अशाच टॉपच्या ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे तुम्ही गेलात तर, तुमची पावसाळी सहल अविस्मरणीय होईल.

  • लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर वसलेले लोणावळा हे पावसाळ्यात फिरण्यासाठी उत्तम असे ठिकाण आहे. येथे तुम्हाला तलाव, धबधबे आणि पर्वतरांगा एकत्र पाहायला मिळतील.  जून ते सप्टेंबरपर्यंत येथे पर्यटकांची गर्दी असते.  पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते. पावसाळ्यात हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी वाटत नाही. लोणावळा महाराष्ट्रातील लोकांसाठी एक उत्तम विकेंड डेस्टिनेशन (Weekend Destination) आहे. रोजच्या धावत्या जीवन शैलीतून शॉर्ट ब्रेक घेण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे.
  • रत्नागिरी – महाराष्ट्रातील हे शहर समुद्राने वेढलेले आणि अतिशय सुंदर आहे. बाळ गंगाधर टिळकांचा जन्म इथेच झाला. शहराला खूप लांब समुद्रकिनारा आणि अनेक बंदरे देखील आहेत. याशिवाय इथे अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.
  • पाचगणी : हे पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. खरंतर हे ठिकाण पावसाळ्यात जास्तच सुंदर दिसतं. हे राज्यातील प्रसिद्ध आणि सर्वात थंड हिल स्टेशन आहे. सह्याद्री पर्वताच्या पाच टेकड्यांमुळे या ठिकाणाला पाचगणी असे नाव पडले. येथे तुम्ही निसर्गाच्या सुंदर नजारा अनुभवू शकता. पावसाळ्यात पाचगणीची सहल तुमच्यासाठी खूप संस्मरणीय ठरू शकते.
  • महाबळेश्वर : हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे ठिकाण हिरवाई, सुंदर टेकड्या आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथे फिरण्याची मजा द्विगुणित होते. खरे तर पावसाचे थेंब या ठिकाणचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात. महाबळेश्वर अजूनही शहरी गर्दी, अशांतता आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवत आहे. तुम्हाला विश्रांतीचे काही क्षण घालवायचे असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे.
  • लवासा : हे महाराष्ट्रातील पुणे शहराजवळील एक हिल स्टेशन आहे. या शहराला मुंबई आणि पुण्यातील लोकांसाठी वीकेंड गेटवे म्हणतात. आलिशान हॉटेल्स रिसॉर्ट्स, शॉपिंग मॉल्स इथे सर्व काही आहे. या ठिकाणचे निसर्गसौंदर्य केवळ पर्यटकांना आकर्षित करत नाही, तर अनेक प्रकारचे साहसी उपक्रमही येथे करता येतात. पावसाळ्यात फिरण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
  • कोकण किनारा : म्हणजेच पश्चिम घाट खरोखरच पावसाळ्यामध्ये जिवंत होतो आणि प्रत्येकानं इथे पावसाळ्यात एकदा तरी जायलाच हवं. मुंबईपासून गोव्यापर्यंत दक्षिणेकडे जाणार्‍या किनार्‍यामध्ये नयनरम्य किनारपट्ट्या असून येथे तुम्हाला पोस्टकार्ड-एस्क समुद्रकिनारे, मासेमारीची गावे आणि मोडकळीच्या अवस्थेत मात्र तरीही भव्य असे किल्ले पाहायला मिळतील.
  • कळसुबाई शिखर : (Kalasubai Mountain) हे महाराष्ट्रामधील पर्वत राज्यातील सर्वात उंच असे 5400 फूट उंच शिखर आहे. हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. शिखरावर पोहोचण्याचा निर्धार असलेल्या ट्रेकर्सना ह्या पर्वतरांगा खूप आकर्षित करतात. पावसाळ्यात येथील दृश्य खूपच सुंदर आणि लोभस दिसते. त्याचबरोबर या पर्वतावर तुम्हाला अगदी शांत आणि सुखद अनुभव मिळतो.
  • भंडारदरा : हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामधील प्रवरा नदीच्या काठी वसलेले पर्यटन स्थळ असून येथे अनेक धबधबे, निर्वाना शांत पर्वत, सोसाट्याचा घनदाट वारा, घनदाट झाडी, आणि रोमँटिसिझम आणि आनंद व्यक्त करणारे सुंदर वातावरण हे भंडारदर्याचे प्रमुख वैशिष्ठ्य आहे. पावसाळ्यात भेट देण्यासाठी हे एक सुंदर आणि नयनरम्य असे ठिकाण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!