ग्रामपंचायतीमध्ये उडणार निवडणुकीचा ‘धुराळा’

महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 ऑगस्टला मतदान, 5 ऑगस्टला मतमोजणी होणार…!

Maharashtra Gram Panchayat Election 2022 : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 62 तालुक्यामधील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केलेली आहे.

निवडणूक आयोगाने याबाबतचे परिपत्रक जारी केले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 मधील कलम 10 (अ) पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करून राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केलेल्या असून 5 जुलै रोजी आचारसंहिता लागू होणार आहे, तर 4 ऑगस्ट रोजी मतदान, आणि 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढचा महिना ग्रामपंचायत हद्दीमध्ये रणधुमाळी गाजणार आहे.

राज्यात 28 हजार 813 ग्रामपंयायतीपैकी 271 ग्रामपंचयतीमध्ये निवडणूक होणार..

निवडणुका असलेल्या ग्रामपंयचायतमध्ये, निवडणूक क्रायक्रम जाहीर केल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहिल असे जाहीर करण्यात आलेले आहे. या निवडणुकांकरीता नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना बजावले आहे. सकाळी 7:30 ते सायं 5:30 वाजेपर्यंत मतदान होईल. या निवडणुकी दरम्यान कोरोना नियमांचे पालन करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम –
▪️तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 05 जुलै 2022 (मंगळवार ).
▪️नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक आणि वेळ – 12 जुलै 2022 ते 19 जुलै 2022 पर्यंत, आणि वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील.
▪️ नामनिर्देशनपत्राची छाननी दिनांक – 20 जुलै 2022 होईल.
▪️नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख – 22 जुलै 2022 राहील.
▪️निवडणूक चिन्ह नेमण्याचा तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदरांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख – 22 जुलै 2022 दूपारी तीन वाजेनंतर राहील.
▪️मतदान दिंनाक 4 ऑगस्ट 2022 होईल.
▪️मतमोजणी व निकाल घोषित करण्याची तारीख 5 ऑगस्ट 2022 राहील.

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायचीच्या निवडणूका

▪️औरंगाबाद 16
▪️नाशिक – 40
▪️धुळे – 52
▪️जळगाव – 24
▪️अहमदनगर – 15
▪️पुणे – 19
▪️सोलापूर – 25
▪️सातारा – 10
▪️सांगली – 1
▪️जालना – 28
▪️बीड – 13
▪️लातूर -9
▪️उस्मनाबाद – 11
▪️परभणी – 3
▪️बुलढाणा – 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!