वे-श्याव्यवसाय सुरू करण्यासाठी 4 जणांचे घृणास्पद कृत्य; औरंगाबादच्या घटनेने महाराष्ट्र हादरला..

घटस्फोटित महिलेवर आधी चार जणांनी अ-त्या-चा-र केले, त्यानंतर तिचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला वे-श्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याची घटना औरंगाबाद शहरातील जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी या प्रकरणी सुशील जगन्नाथ साध्ये आणि अजय विष्णू मुळे यांना अटक केली आहे, तर अन्य आरोपी फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय पीडित तरुणी कारचे कर्ज घेताना आरोपी सुशिल साध्ये याला भेटली होती. दरम्यान, 27 मे 2019 रोजी आरोपीने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अ-त्या-चा-र केला आणि केलेल्या कृत्याचे मोबाईलवर व्हिडिओ व फोटो काढले. नंतर इतरांनी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर अ-त्या-चा-र केला.

पीडितेने आरोपीकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड वेळेत न झाल्याने लोहाराने रामचंद्र पाटील यांना पीडितेच्या घरी आणले. तसेच पीडितेवर अ-त्या-चा-र केला. यानंतर लोहार व त्याची पत्नी श्रद्धा लोहार या दोघांनी वारंवार पीडितेला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी ग्राहकांना पीडितेच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगत होता, त्यानंतर तो स्वत: पीडितेला पैसे काढण्यास सांगून पैसे काढत होता. पीडितेच्या तक्रारीनुसार जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!