50 hajar anudan yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेला मिळणार 50 हजार रुपये अनुदान
50 hajar anudan yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. यामध्ये कर्जाची नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
50 hajar anudan yojana 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांना अडीच वर्षे वाट पाहावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच्या निकषात काही बदल केले. 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षांत दोन वर्षे कर्जाची नियमितपणे परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (50 hajar anudan news)
भरपूर दिवसांपासून राज्यातील शेतकरी या 50 हजार अनुदानाची वाट पाहत आहे. परंतु, आता प्रतिक्षा संपलीच आहे. कारण 50 हजार अनुदानाची पहिली यादी 12 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली आहे. यासाठी ‘केवायसी’ देखील सुरू झाली आहे. दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगण्यात आले. (50 hajar anudan yadi)
50 hajar anudan yojana yadi ज्या शेतकऱ्यांचे पहिल्या यादीत नाव असेल, अशा शेतकऱ्यांना ‘केवायसी’ करायची आहे. ‘केवायसी’ केल्याशिवाय 50 हजार अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही. लवकरात लवकर जवळच्या ‘सीएससी’ केंद्र (CSC) म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन ‘केवायसी’ करून घ्या. (50 hajar anudan)
या तारखेला मिळणार अनुदान..
50 hajar anudan kadhi milnar अनेक काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानाची वाट पाहत आहे. आता त्याबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारच्या ‘Maharashtra DGIPR’ अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ट्विट करून तारीख सांगण्यात आली आहे. यामध्ये ट्विट करून काय सांगितले आहे, जाणून घेऊ या..
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ 20 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. म्हणजेच शेतकऱ्यांना 20 ऑक्टोबरला अनुदान मिळणार आहे.
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- आता सातबारा काढा मोबाईलवरून घरबसल्या, कसा काढायचा जाणून घ्या..