|

All land information 2024 : कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती एकर जमीन आहे? कोण आहे जमिनीचा खरा मालक? एकाच ठिकाणी मोफत मिळणार सर्व माहिती..!!

All land information 2024

All land information 2024: जमीन किंवा प्लॉट खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असताना खूपच सावधगिरी बाळगण्याची गरज असते. खरेदी खतापासून ते व्यवहार पूर्ण होईपर्यंत, तसेच घर/प्लॉट तुमच्या नावावर होण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचीच काळजी घेणे गरजेचे असते, अन्यथा या व्यवहारात फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.

कारण बऱ्याचवेळा घर/जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये फसवणूक होऊन एकच घर/जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींना सर्रासपणे विक्री करण्यात येऊन अशा फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असून फसवणूक झाल्यास तुमचे पैसे तर वाया जातातच पण मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे कोणत्याही जमिनीची खरेदी/विक्री करण्यापूर्वी त्या जमिनीची/प्लॉटची संपूर्ण All land information माहिती सहजरित्या मिळाली तर किती बरे होईल ना.

घर बांधण्यासाठी कर्ज घ्यायचे आहे? जाणून या सोप्या टिप्स

होय, आता राज्याच्या महसूल विभागातर्फे नागरिकांना अशाचप्रकारच्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध झालेल्या आहेत.

महसूल विभागाने एक वेबसाइट विकसित केली असून या वेबसाइटवरून तुम्हाला राज्यातल्या सर्वच जमिनीची माहिती सहजरित्या मिळू शकते.

कोणाच्या नावावर किती जमीन/प्लॉट आहे? असे तपासा All land information

महसूल विभागामार्फत वेबसाइटद्वारे जमिनीचा नकाशा, जमिनीचे पत्रक, खरेदीखतांच्या नोंदी ई. सर्व कागदपत्रे सहजरित्या तपासता येतात. यासाठी तुम्हाला फक्त महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइट ओपन करून खालील सोप्या स्टेप्स फॉलो करायाच्या आहे

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइट ओपन करण्यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  • या लिंकवर क्लिक करावे..
  • नंतर तुमचा जिल्हा निवडा.
  • नंतर तुमचा तालुक्यातील तहसीलचे नाव निवडा.
  • यानंतर तुम्हाला ज्या गावातील जमिनीची माहिती जाणून घ्यायची आहे त्या गावाचे नाव प्रविष्ट करा.
  • नंतर समोर दिसत असलेल्या पर्यायांतून खातेधारकाच्या नावानुसार शोध या पर्यायाची निवड करा.
  • नंतर जमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकाच्या नावाचे पहिले अक्षर टाकून शोध पर्यायावर क्लिक करा.
All land information
  • नंतर तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नाव शोधयचे आहे त्याच्या नावाची निवड करावी लागेल.
  • नंतर कॅप कोड प्रविष्ट करावा लागेल.
  • कॅप कोड टाकल्यावर, तुमच्या स्क्रीनवर संबंधित व्यक्तीच्या नावावर असलेली जमिनीची पूर्ण माहिती दिसेल.
  • यात तुम्हाला खसरा क्रमांक अर्थातच त्या जमिनीचा गट क्रमांक बरोबरच पूर्ण तपशीला बरोबरच त्या व्यक्तीच्या नावावर एकूण किती जमीन आहे हे देखील दिसेल.

याप्रकारे महसूल विभागाच्या वेबसाईटवरून तुम्ही खरेदी करत असलेल्या जमिनीची पूर्ण माहिती अगदी पाच मिनिटात मिळून फसवणूक टाळता येईल. All land information

Similar Posts