धनंजय मुंडे यांनी त्यांची सहा मुलं आणि अनेक बायका सुद्धा लपावल्या; करुणा शर्माचे खळबळजनक आरोप..
महाराष्ट्रात कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधीच राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. कारण, या निवडणुकांच्या तोंडावर करुणा शर्मा यांनी निवडणूक लढण्याची घोषणा करताच धनंजय मुंडेंवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.
करुणा शर्माने धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत म्हणले की, धनंजय यांनी स्वतःच्या सहा मुलांबरोबर स्वतःच्या अनेक बायका लपवल्या आहेत. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत, असा हल्लाबोल करुणा शर्मा यांनी कोल्हापूर येथे बोलताना केला.
करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली असून श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन त्या आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. देवीच्या आशीर्वादाने आपल्याला निश्चितच विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
रेल्वे रुळावर उडी मारून पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले जीव..संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद…
जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असल्याचे सांगून आपण महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहोत. तसेच कोल्हापुर मधील घराणेशाहीमुळे केलेल्या राजकारणामुळे इथला विकास थांबला आहे. त्यामुळे इथली घराणेशाही आपण संपवणार आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, करुणा शर्मा यांच्या या आरोपाला धनंजय मुंडे काय उत्तर देणार याची उत्सुकता साऱ्यांनाचा आहे.
आहे तरी कोण करुणा शर्मा?
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने ब.ला.त्का.राचा आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे ब.ला.त्का.राचा आरोप फेटाळून लावत रेणू मला ब्लॅकमेल करत असल्याचे म्हणाले होते. मात्र, हा आरोप फेटाळत असताना धनंजय यांनी एका महिले बरोबर (रेणूची बहीण करुणा बरोबर) परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. आणि त्या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं. परंतु, करुणा हिच्यासोबत विवाह झाल्याचे त्यांनी कबूल केलेले नाही.
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची प्रेमकहाणी मराठीत येणार..
पुढे बोलतांना करुणा शर्मा म्हणाल्या की, माझी आणि धनंजयची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली आहेत. त्यांनी स्वतःच्या अनेक बायका लपवल्या आहेत. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. कारण माझ्याकडे सारे कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे मला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. आता तिच्या या आरोपामुळे काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
नवी पक्षाची केली स्थापना
करुणा शर्माला अनेक पक्षांनी राजकारणात येण्यासाठीची ऑफर दिली होती. तसा दावा त्यांनी यापूर्वी स्वतः केला होता. मात्र नंतर तिने शिवशक्ती सेना नावाच्या पक्षाची स्थापना केलीय. शिवाय त्यांनी बीडमधील परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्याविरोधातही निवडणूक लढवण्याचा इशारा यापूर्वी दिलाय.
तसेच माझ्या सारख्या अनेक मंत्र्यांच्या पत्नींवर अन्याय होत आहे. त्यातील अनेक महिला माझ्या संपर्कात आहेत, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.