क्षीरसागरात घडले साक्षात भगवान विष्णूंचे दर्शन; ‘या’ मूर्तीचे रहस्य जाणून घ्या..!
प्राचीन धार्मिक हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे क्षीरसागरात मध्ये शेषनाग वर वास करत असून भगवान विष्णू हे क्षीरसागरात निद्रीस्त अवस्थेमध्ये असलेले दृष्य तुम्ही अनेकदा टीव्हीवर सुद्धा पाहिले असेल. मात्र, देशातील एका शहरामध्ये हेच दृश्य आसाममधील गुवाहटीत हे चित्र समोर आलं आहे. आसाममध्ये दरवर्षी पूर आल्यावर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. यावर्षी सुद्धा हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
श्रीमन् नारायण नारायण हरि हरि हे संगीत असलेला हा व्हिडिओ ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी चकेश्वर मंदिरामध्ये भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीच्या या रुपाचे दर्शन घडते. पण थांबा,,! या फोटोमागचे खरे कारण वेगळेच आहे. क्षीरसागराचे हे दृश्य एका सिमेंट पिलरच्या सहाय्याने तयार करण्यात आले असून या पिलरवर शेषनाग आणि त्यावर भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीची मूर्ती बसवण्यात आली आहे.
जेव्हा जोरदार पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते तेव्हा क्षीरसागराच्या मूर्तीच्या खालील पिलरचा संपूर्ण भाग पाण्याखाली जातो त्यामुळे भक्तांना भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर निद्रिस्त अवस्थेत असलेले दृश्य नजरेस पडते.
पाहा व्हिडिओ….