karj mafi yojana

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022 | शेतकऱ्यांनो! 50 हजार रुपये अनुदान मिळवण्यासाठी लवकर करा ‘हे’ काम

Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana 2022:

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे.. महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. शेतकरी या अनुदानाची वाट पाहत आहे.

महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना karj mafi yojana 2017-18 पासून 2020 पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी पाठविली असून, त्यातून यादीतून पात्र शेतकरी निवडलेले आहेत. (MJPSKY List 2022)

karj mafi yojana
karj mafi yojana

karj mafi yojana मधून या शेतकऱ्यांना वगळले..

ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 50 हजार रुपयांहून कमी आहे, त्यांना कर्जाएवढीच रक्कम प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिल्या जाणार आहे.. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांच्याकडील नियमित कर्जदारांची यादी सहकार विभागाकडे सादर केली होती. या याद्यांची छाननी देखील झालेली आहे. आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकाऱ्यांना वगळले आहे.

karj mafi yojana स्थिती

दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी – 36.64 लाख
मिळालेली कर्जमाफी – 20,000 कोटी
अंदाजित नियमित कर्जदार – 23.11 लाख
प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद – 10,000 कोटी (50000 Anudan Yojana Maharashtra)

सध्या, दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला.. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. (Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana List)

प्रोत्साहनपर अनुदान कधी मिळणार..?

महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. या अनुदानाचे वाटप सप्टेंबरपासून सुरु करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान 50 हजार कर्जमाफीच्या याद्या प्रकशित होण्यास सुरुवात होईल. याद्या प्रकाशित झाल्यावर त्याची माहिती व याद्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. 50000 प्रोत्साहनपर अनुदानाबाबत सहकार आयुक्त यांनी माहिती दिली आहे. (Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana 2022)

‘हे’ काम करा तेव्हाच मिळणार प्रोत्साहनपर अनुदान..

तुमच्या बॅंक खात्याशी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे.
जर तुमचं बॅंक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास, तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यास अडचण येईल.
तसेच तुम्ही या योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

हे देखील वाचा-

Similar Posts