औरंगाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांचा बलात्कार…

काल 15 ऑगस्ट, सोमवार रोजी औरंगाबाद जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे पीडित मुलगी गावात शेतात मजुरीचे काम करते. सोमवारी सुद्धा ती पोटाची खळगी भरण्यासाठी दोन पैसे कमावण्याकरीता घराबाहेर पडली. तेव्हा ते 6 नराधमांनी तिथेच उभे होते. त्यातल्या दोघांनी मिळून पीडितेला उचलून एका निर्जन भागात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्या सहापैकी 1 आरोपी अल्पवयीन विधी संघर्ष मुलगा देखील होता. A minor girl was raped by six murderers in Aurangabad district

पीडिता वेदनेने विहळल्यामुळे तिला हालचाल देखील करता येत नव्हती तेव्हा ते निर्दयी आरोपी पीडितेला तश्याच अवस्थेमध्ये सोडून पळून गेले. अतीव वेदनांनी श्वास कोंडलेली पीडित मुलगी कशीतरी रेंगाळत तिच्या घराकडे आली. रडत रडत तिने घडलेली घटना आईला सांगितली. आईने क्षणाचाही विलंब न लावता थेट कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईने तत्काळ तक्रार नोंदवताच पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि आरोपी पळून जाण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

वेदना मर्यादेपलीकडे वाढल्याने आईला सांगितले सत्य

यातील काही आरोपींनी यापूर्वीही पीडित मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केला होता. मात्र पीडितेने भीतीपोटी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण जेव्हा सहा नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, तेव्हा असह्य वेदनांनी ग्रासलेल्या या पीडितेने सर्व घटना आईला सांगितली आणि ही हृदयद्रावक वेदनादायक घटना समोर आली. सध्या औरंगाबाद ग्रामीण पोलीस या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात स्तब्धता पसरली होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!