मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले ; मास्क देखील ऐच्छिक..
ठाकरे सरकारने राज्यातील जनेतला दिले गिफ्ट, सर्व निर्बंध हटवले, गुढीपाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमझान ईद उत्साहात साजरा होणार..
राज्य सरकारनं कोरोना संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्च 2020 मध्ये लावण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. पण तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंध पूर्णपणे शिथील करण्यात आले असून मास्क लावणे देखील ऐच्छिक करण्यात आलेले आहे.
राज्यात 1 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान राज्य सरकार तर्फे संचारबंदी लागू करण्यात आली होती. अशा परिस्थितीत गुढीपाडवा, रामनवनी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. विरोधकांनी यासंदर्भात ठाकरे सरकारवर टीका केली होती. यानंतर आता ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 1 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून हे निर्बंध उठवण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गुढीपाडवा जोरात साजरा करता येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अगदी जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रमझान ईद देखील साजरी करण्यास कोणतेही प्रतिबंध असणार नाहीत.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत.
सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा.
राज्याची आपली परंपरा पुढं न्याव्यात, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मास्क घालणं ऐच्छिक असल्याची माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
राज्यातली ताजी करोना आकडेवारी..
गुरुवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १८३ नवीन करोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. तर राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाले आहे. या बरोबरच एकूण २१९ रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात ७७ लाख २५ हजार ३३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट आजघडीला ०९.९२ टक्के इतका आहे.