bageshwar dham in sambhajinagar : बागेश्वर बाबां’चा 6, 7 आणि 8 नोव्हेंबरला संभाजीनगरात भरणार दरबार..

bageshwar dham in sambhajinagar अनेक भाविकांचे श्रद्धास्थान नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे बागेश्वर धाम यांचा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दरबार भरणार आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच, 6, 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी हा दरबार शहरात भरणार आहेत.

bageshwar dham in sambhajinagar

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मध्यप्रदेशातील छत्रपूर येथे जाऊन बागेश्वर महाराज यांची भेट घेतली होती. तसेच, बागेश्वर धाम यांना छत्रपती संभाजीनगर शहरात दरबार भरवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता बागेश्वर धाम यांनी 6, 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात राम कथा करणार असल्याचे सांगितले..

बागेश्वर धामचे प. पू. धिरेंद्र शास्त्री यांचा हा कार्यक्रम भव्य दिव्य असा स्वरूपाचा असणार असून, शहरातील आरटीओ कार्यालया समोरील अयोध्या नगरी मैदान येथे भव्य मंडप उभारण्यात येत असून या किमान दहा लाख नागरिकांना भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून या तीन दिवसांमध्ये बाबांचा दरबार भरणार आहे. शिवाय तीन दिवस भरगच्च कार्यक्रम सुद्धा राहणार आहे. सध्या सुदीचे दिवस सुरू असून, दिवाळीच्या अगोदरच बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे.

बागेश्वर धाम हे स्थान मध्य प्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यातील गारा गावामध्ये असून डॉ. भागवत कराड गेल्या सहा महिन्यापासून बागेश्वर धाम संस्थानच्या संपर्कात होते. शिवाय, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे दरबार भरवण्याचे निमंत्रण सुद्धा देत होते. त्यांचे निमंत्रण बागेश्वर बाबा यांनी स्वीकारलेले असून, नोव्हेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे ते येणार आहे .

डॉ. भागवत कराड हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असून कराड यांच्या नेतृत्वात हा तीन दिवसांचा दरबार भरणार आहे. या दरबारामध्ये जवळपास १० लाख भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दिवाळीच्या आठ दिवस पूर्वी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे संभाजीनगरला येणार असल्यामुळे त्यांच्या भक्तांसाठी ही सर्वात आनंदाची बातमी आहे.

दरबाराच्या आयोजनाकरिता तयारी सुरु bageshwar dham in sambhajinagar

बागेश्वर धाम दरबाराच्या आयोजनाकरिता दरबाराच्या ठिकाणी मोठा मंडप उभारण्यात येत आहे. शिवाय, भाविकांच्या निवासाकरिता मोठ्या प्रमाणात तंबूंची व्यवस्था करण्यात येणार आहे. बागेश्वर धामच दरबाराच्या निमित्ताने संभाजीनगरमध्ये मोठी सभा आयोजित केली जाणार आहे. या सभेत बागेश्वर धाम सरकार भक्तांना मार्गदर्शन करतील.

तुमच्या जमिनीचा नकाशा घरबसल्या मोफत डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

लेक लाडकी योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

Similar Posts