Government Job : सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी, महाराष्ट्र सरकारतर्फे आरोग्य विभागात 11000 पदांची बंपर भरतीची अधिसूचना जारी..

Government Job : प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की, आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, त्यासाठी अनेक विद्यार्थी वर्षोनुवर्षे सरकारी नोकरीसाठी अभ्यास व प्रयत्न करून योग्य भरतीची वाट पाहत असतात. भरती जाहीर झाल्यावर अर्ज करुन नोकरी मिळवतात. राज्यात कोरोनामुळे दोन वर्ष कोणतीच भरती झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र कोरोनानंतर सतत वेगवेगळ्या विभागांकरिता सरकारी नोकरी जाहीर करण्यात येत असून आतासुद्धा अशी भरती जाहीर करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी गृह विभागाने पोलीस भरतीची घोषणा केली होती. नंतर वन विभागाने वन संरक्षक आणि मसहूल विभागाने तलाठी भरतीची घोषणा केली होती. सध्या राज्यात तलाठी पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी परीक्षा घेतली जात आहे. या भरतीसाठी सुमारे 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाने मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. स्वत: आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

राज्यातील आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन विविध जिल्ह्यांच्या जाहिराती आज म्हणजेच मंगळवारी प्रसिद्ध झाल्या असून या भरती अंतर्गत गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपासून सुरु होत आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे..

मंत्री तानाजी सावंत यांनी नेमकी काय घोषणा केली?

राज्यात आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून आरोग्य विभागात 11000 पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे राज्यातील नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांना आता चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

आरोग्य विभागातील कमी मनुष्यबळामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत असल्याच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा देखील होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं असून आरोग्य विभागात तब्बल 11 हजार पदांची बंपर भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

आरोग्य विभागातील 11 हजार पदांसाठी उद्या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकाऱ्यांची देखील निवड होणार आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठी देखील ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!