Dal Mill Subsidy in Maharashtra | दाळ मिल मशीनवर 60% अनुदान, असा घ्या योजनेचा लाभ

Dal Mill Subsidy

Dal Mill Subsidy in Maharashtra: भारत हा कृषीप्रधान देश आहे.. भारत हा शेतीच्या विकासाकडे जात असून सध्या अनेक मोठे शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करून, नवनवीन प्रयोग करत आहेत. बरेचसे शेतकरी आपल्या शेतीतून उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे जोडधंदा म्हणून विविध व्यवसाय करून अधिक उत्पन्न मिळवत असतात.

जोडधंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय शेतकरी करत असतात. शेती करता करता अनेक शेतकरी स्वतः व्यवसाय करून चांगली कमाई करतात. यासाठी सरकार देखील काही ना काही व्यवसाय किंवा जोडधंदा करण्यासाठी शेतकऱ्यांना योजनेमार्फत प्रोत्साहित करत आहे. (Dal Mill Anudan Yojana Maharashtra)

यासाठी शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी डाळ मिळ खरेदी करण्यासाठी राज्य सरकार अनुदान देत आहे. (Maharashtra Yojana) कारण सर्वांनाच डाळ मिळ मशीनची किंमत जास्त असल्याने खरेदी करणं शक्य होतं नाही. यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. ‘Mini Dal Mill Subsidy in Maharashtra’

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजना राबविल्या जातात. यानंतर आता दाळ मिल मशीनवर सुद्धा आता सरकार अनुदान देणार आहे. या अनुदानाचा फायदा राज्यातील तमाम शेतकरी बांधव घेत आहेत. राज्य सरकार या योजनेअंतर्गत दाळ मिल मशीनवर अनुदान देत आहे. (Dal Mill Subsidy)

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला राज्य सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत कमी पैशांत दाळ मिल यंत्र दिले जाते. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचण्यासाठी सरकारने कृषी यांत्रिकीकरण उपविभागीय अभियान सुरू केले आहे.

दाळ मिल अनुदान महाराष्ट्र
मिनी दाळ मिल योजना महाराष्ट्र सरकारने आणि कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत सुरू केली आहे. ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे. राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत दाळ मिल मशीनवर 50 ते 60 टक्के अर्थसाहाय्य दिले जाते.

दाळ मिल मशीनवर 50 ते 60 टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात दाळ मिल मशीन उपलब्ध होत आहे. सरकारच्या अशा योजनांमुळे शेतकऱ्यांना अर्ध्यापेक्षा कमी किंमतीमध्ये दाळ मिल मशीन मिळू शकते.

या योजनेअंतर्गत SC/ST, जमाती, अल्पवयीन आणि अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना 60 टक्के किंवा 1,50,000 आणि इतर लाभार्थ्यांसाठी 1,25,000 पैकी 50 टक्के यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम दिल्या जाते.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र प्रत (SC/ST शेतकरी लाभार्थ्यांसाठी)
फोटो ओळखपत्राची स्वयं साक्षांकित प्रत
बॅंक पासबुक प्रत
सातबारा व 8अ उतारा
दर पत्रक/उपकरणे/उपकरणे घेण्याच्या अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन
संस्था अ-परतावा प्रमाणपत्र (संस्था असल्यास)

येथे करा अर्ज..
या योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा अधिक्षक अधिकारी येथे संपर्क साधावा. राज्य सरकारच्या डाळ मिल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज डाऊनलोड करण्यासाठी ‘येथे क्लिक करा’वर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करून घ्या

दाळ मिल योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

हे देखील वाचा-


Similar Posts