Driving License Online Application Process in Maharashtra : घरबसल्या फक्त 151 रुपयांत काढा ड्रायव्हिंग लायसन्स; ते सुद्धा 5 मिनिटांतच..

Driving License Online Application Process in Maharashtra : आजकाल गाडी चालवताना चालविणाऱ्या प्रत्येकाकडे ड्रायविंग लायसन्स असणे अत्यंत आवश्यक असते. ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही अटी लागू केल्या आहेत. स्वतः ड्रायव्हिंग केल्यामुळे तुम्हाला बस किंवा इतर सार्वजनिक वाहनापेक्षा जलद गतीने इच्छित स्थळ गाठून काम करता येईल. शिवाय ड्राइविंग लायसन हे ओळख आणि वयाचा वैध पुरावा म्हणून सर्वत्र स्वीकारले जाते.

Driving License Online Application Process

पूर्वीच्या काळी ड्रायव्हिंग लायसन काढणे म्हणजे एक किचकट प्रक्रिया होती, मात्र सध्याच्या डिजिटल काळात अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईलवर लायसन्ससाठी अर्ज करणे आणि ते मिळवणे अगदी सोपे आहे. तर मग जाणून घ्या घरबसल्या ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सोपी प्रक्रिया. Driving License Online Application Process

महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करावा (Driving License Online Application Process)

राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स काढणे अगदी सोपे झाले आहे. महाराष्ट्रातील नागरिकांचा विचार करून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहेत.

1) सर्वात पहिले Parivahan.gov.in या वेबसाईटवर जावे.
2) नंतर Online Services या पर्यायावर क्लिक करून Sarathi Services या पर्यायाची निवड करा.
3) नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर Apply NEW LEARNER’S LICENSE हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून Continue या पर्यायावर क्लिक करा.
4) नंतर Applicant does not have any Driving License/Learner License issued in India या पर्यायाची निवड करून Via Aadhar Authentication या पर्यायावर क्लिक करा.
5) नंतर OK या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार नंबर नमूद करावा.
6) त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे त्या मोबाईलचा नंबर टाकावा.
7) नंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल तो OTP नमूद करावा.

मानी व्ह्यू देत आहे 10 लाखांचे कर्ज फक्त पाचच मिनिटांत

8) नंतर Accept Declaration हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करून ड्रायव्हिंग लायसन्सचा फॉर्म सबमिट करा.
9) ड्रायव्हिंग लायसन्सचा फॉर्म सबमिट केल्यावर Class of Vehicle या पर्यायाची निवड करून तुम्हाला कोणत्या प्रकारचे वाहनाचे लर्निंग लायसन्स काढायचे आहे त्या पर्यायची निवड करा.
10) नंतर जनरेट सिस्टीमवर एक ॲप्लीकेशन नंबर तयार होतो. त्यानंतर स्क्रीनवर असलेल्या रकान्यात 20 Kbps पर्यंतची तुमची स्वाक्षरी अपलोड करावी.
11) नंतर लर्निंग लायसन काढण्यासाठी लागणारी 150 रुपये इतकी फी सुद्धा ऑनलाईन भरावी.
12) सर्वात महत्वाचे म्हणजे लर्निंग लायसन्स काढण्यासाठीची फी भरल्यावर तुम्हाला 20 मिनिटांचा रोड सेफ्टीचा व्हिडिओ पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
13) 20 मिनिटांचा व्हिडिओ पाहल्यावर 15 गुणांची एक परीक्षा द्यावी लागेल.
14) या परीक्षेत विचारलेल्या 9 प्रश्नांची बरोबर उत्तर दिल्यानंतर तुम्हाला लगेचलर्निंग लायसन्स मिळते. (Driving License Online Application Process)

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Driving License in Maharashtra) :

अर्ज
शिकाऊ परवाना (मूळ)
पासपोर्ट फोटो
जन्मदाखला
रहिवासी दाखला
ड्रायव्हिंग स्कूल प्रमाणपत्र
ड्रायव्हिंग चाचणीसाठी वापरल्या जाणार्‍या कारशी संबंधित सर्व कागदपत्रे
शाळेचे प्रमाणपत्र
मतदाराचे ओळखपत्र
पॅनकार्ड
यासह राज्य सरकारने विहित केलेले इतर कागदपत्र आवश्यक असतील.

लाईसन्स काढण्याचे शुल्क (Driving License Online Application Process)

जर तुम्हाला ड्रायविंग लायसन्स काढायचे असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लायसनसाठी किती शुल्क लागतात याची माहिती असणे आवश्यक आहे.

लर्निंग लायसन्स – 151 रुपये
टेस्ट फी – 50 रुपये
ड्रायविंग लायसन्स – 716 रुपये
ड्रायव्हिंग लायसन नूतनीकरण – 416 रुपये
डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन – 216 रुपये
कालावधी संपल्यावर अर्ज केलेला असल्यास : 1000 रुपये

ड्रायव्हिंग लायसन्सचे फायदे Benefits Of Having A Driving license In India :

1) भारत देशात जारी करण्यात आलेले ड्रायव्हिंग लायसन्स हे पूर्ण भारतात वैध असे कागदपत्र आहे.

2) ड्रायव्हिंग लायसन्स हा भारतीय नागरिकाचा ओळखीचा, राष्ट्रीयत्वाचा आणि वयाचा एक मुख्य असा पुरावा आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स हे अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे कारण ड्रायव्हिंग लायसन्स म्हटल्यास अर्जदाराची सर्व तपासणीनंतर केवळ पात्र असलेल्या उमेदवारांनाच ड्रायव्हिंग लायसन मिळतो. परिणामी, नागरिकाचा ओळख, त्याचे राष्ट्रीयत्व आणि त्याचे वय प्रमाणित करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. (Driving License Online Application Process)

3) भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये सर्व वैयक्तिक माहिती साठवलेली असते : आता ड्रायव्हिंग लायसन्स डिजिटल स्वरूपात लहान आणि सोनेरी चीप असलेल्या स्मार्ट कार्डच्या स्वरूपामध्ये जारी करण्यात येत. या चिपमध्ये लायसन धारकाची बायोमेट्रिक माहिती देखील समाविष्ट असते. चालकाची माहिती मिळवण्याकरिता अधिकारी ही सोनेरी चिप स्कॅन करतात.

4) भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स 20 वर्षांसाठी वैध असते : वाहन चालवण्याचा परवाना जारी केल्यावर तो 20 वर्षांसाठी वैध मानला जातो. ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता फक्त इतर वेळी संपेल जेव्हा वाहक 50 वर्षांच्या वयापर्यंत पोहोचतो. जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपते तेव्हा उमेदवाराने शक्य तितक्या लवकर RTO कडे त्याचे नूतनीकरण करावे. वैध चालक परवान्याशिवाय वाहन चालवणे हे गुन्हेगारी उल्लंघन आहे. (Driving License Online Application Process)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!