महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, व सुंगधित तंबाखू वाहतूक करणारी आयशर व्हॅन असा एकूण 52,15,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

दिनांक 06/05/2022 रोजी फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, यांना त्यांच्या गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे फर्दापुर हद्यीत जळगाव ते औरंगाबाद हायवे रोड ने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व सुगंधित तंबाखु आयशर कंटेनर मध्ये चोरटी विक्री करण्यासाठी अवैध गुटखा, पान मसालाची वाहतुक केली जाणार असल्याची खात्रीलायक गोपणीय बातमी मिळाल्याने स.पो.नि. वाघमोडे व त्यांचे पथकाने तात्काळ संध्याकाळी 7:00 वाजेच्या दरम्यान जळगाव ते औरंगाबाद हायवे रोडवर हॉटेल कन्हैया कुंज जवळ सापळा रचला.

मिळालेल्या माहिती प्रमाणे त्यांना समोरून एक आयशर कंटेनर वाहन येतांना दिसला. सदर वाहन चालकास गाडी थांबवण्याचा इशारा देवुन वाहन थांबविले. नंतर चालकास विचारपुस करता वाहनचालक हा उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने पोलीसांचा संशय बळकावला.. त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव हमीद हरुण खॉ वय 35 वर्षे रा. नखरोला जि. पलवल हरियाणा राज्य येथील असुन सदर वाहन हे दिल्ली येथुन घेवून सोलापुर कडे जास्त असल्याचे सांगितले.

नमुद आयशर वाहन क्रमांक HR. 73 A-2236 याचे सिल पंचासमक्ष तोडुन त्यांची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 29,95,200/- रुपये किंमतीचा प्रिमियम राज निवास पान मसालाच्या 78 गोण्या व 15 गोण्या प्रिमियम एक्स. एल. सुंगधीत तम्बाखूच्या 7,20,000/- रुपये कि.अं. गोण्या मिळून आला. लाल रंगाचा आयशर कंटेनर 15,0000/- अस एकुण 52,15,200/- रुपयांचा मुद्देमालहा पंचासमक्ष जप्त करण्यांत आला आहे.

यावरून पोलीस ठाणे फर्दापुर येथे गुरनं. 41/2022 कलम 188,273,328 भादंवी व कलम 59 अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन वाहन चालक हमीद हरुण खॉ वय 35 वर्षे रा. नखरोला जि. पलवल हरियाणा राज्य यास अटक करण्यात आली आहे. व पुढील तपास स.पो.नि. वाघमोडे करित आहेत.

सदरची कामगिरी मा. मनीष कलवानिया, पोलीस अधिक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. विजयकुमार मराठे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोडा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. देविदास वाघमोडे, स.पो.नि. पोलीस अंमलदार सचिन काळे, योगेश कोळी प्रदिप बेदरकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!